Rohit Sharma Ravi Shastri IND vs AUS esakal
क्रीडा

Rohit Sharma : मूर्खपणा! रोहित शर्माने रवी शास्त्रींच्या 'त्या' वक्तव्यावर दिली कडक प्रतिक्रिया

अनिरुद्ध संकपाळ

Rohit Sharma Ravi Shastri IND vs AUS : भारतीय संघाचे माती प्रशिक्षक रवी शास्त्रींनी भारतीय संघ इंदूर कसोटी हरल्यानंतर कडक शब्दात प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी भारतीय संघ अतीआत्मविश्वासामुळे हरला असे म्हणाले होते. यावर रोहित शर्माने चौथ्या कसोटीच्या पूर्वसंध्येला कडक शब्दातच प्रतिक्रिया दिली. त्याने हे वक्तव्य मूर्खपणाचे असल्याचे सांगितले.

रवी शास्त्री यांनी स्टार स्पोर्ट्सवर समालोचन करताना भारताच्या पराभवावर वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले की, 'हा थोडा आत्मसंतुष्टपणा आणि अतिआत्मविश्वास चा परिणाम आहे. संघाने गोष्टी गृहीत धरल्या. तुम्ही निष्काळजीपणा केला त्यांनी तुम्हाला पराभूत केले.'

रोहित शर्माने गेल्या 18 महिन्यात रवी शास्त्रींवर बोलताना संयम बाळगला होता. मात्र त्याला रवी शास्त्रींनी तिसऱ्या कसोटीचे केलेले विश्लेषणाबाबत विचारण्यात आले त्यावेळी त्याने कडक शब्दांचा वापर केला. तो म्हणाला, 'खरं सांगू का ज्यावेळी तुम्ही दोन सामने जिंकता त्यावेळी बाहेरचे लोकं समजतात की आमच्यात अतिआत्मविश्वास निर्माण झाला आहे. हा पूर्णपणे मूर्खपणा आहे. आम्ही सर्व चारही सामन्यात आमचा सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करतो.'

रोहित शर्माने टीका करताना विराट कोहलीचाच कित्ता गिरवला. तो म्हणाला की, 'तुम्ही दोन सामने जिंकून थांबू शकत नाही. हे खूप साधं आहे. हे जे सर्व लोकं अतिआत्मविश्वासाबद्दल बोलत आहेत. जे या ड्रेसिंग रूमचा भाग नाहीयेत त्यांना माहिती नाही की ड्रेसिंग रूममध्ये काय चर्चा होते.'

(Sports Latest News)

हेही वाचा : परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divya Mittal IAS Resignation : आयएएस पदाचा राजीनामा, आता राजकारणात एंट्री; दिव्या मित्तल यांची मोठी घोषणा, म्हणाल्या...

Pune Mega Plan : पुण्याचा २०३६ चा मेगा प्लॅन विकास आराखडा तयार : अर्थव्यवस्था २२० अब्ज डॉलर करण्याचे उद्दिष्ट

Solapur Farmer Loan Waiver : 59 हजार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा; त्रुटी दूर, नवीन यादी लवकरच होणार जाहीर, आतापर्यंत 30 हजार 500 शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध

Marathi News Live Updates: ९० कोटींच्या रस्ता निविदेवरून आमदाराचा महापालिका आयुक्तांना धमकीचा आरोप; ठेकेदाराच्या पात्रतेवरून नेमका काय घडला वाद?

Election Symbol Controversy : निवडणूक आयोग एखाद्या पक्षाच्या सांगण्यावरून काम करत असेल तर आता काय उरते?; हायकोर्टाचा सवाल

SCROLL FOR NEXT