Rohit Sharma Says We were in no position to win esakal
क्रीडा

Rohit Sharma : 'इथं' फिरला सामना! पाकवरील थरारक विजयानंतर रोहितची प्रतिक्रिया

अनिरुद्ध संकपाळ

Rohit Sharma INDvsPAK : मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर नखे कुरतडायला लावणाऱ्या सामन्यात भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा शेवटच्या चेंडूवर 4 विकेट्स राखून पराभव केला. भारताला विजयासाठी एका चेंडूवर 1 धावेची गरज असताना अश्विनने चौकार मारत सामना संपवला. भारताकडून विराट कोहलीने 53 चेंडूत नाबाद 82 धावा ठोकत विजयात सिंहाचा वाटा उचलला. तर हार्दिक पांड्याने 37 चेंडूत 40 धावा करत विराटसोबत 113 धावांची भागीदारी रचली. गोलंदाजीत पांड्या आणि अर्शदीपने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. भारताच्या विजयानंतर कर्णधार रोहित शर्माने प्रतिक्रिया दिला. तो म्हणाला की आम्ही सामना जिंकण्याच्या स्थितीतच नव्हतो. विराट कोहलीला सलाम!

सामन्यानंतर रोहित शर्मा म्हणाला की, 'मी ड्रेसिंग रूममध्ये होतो. माझ्याकडे बोलण्यासाठी शब्दच नव्हते. अशा सामन्यात असा थरार तुम्हाला अपेक्षित असतो. आम्ही सामन्यात जितका काळ राहता येईल तितका काळ राहण्याचा प्रयत्न करत होतो.'

रोहित पुढे म्हणाला की, 'विराट आणि हार्दिक पांड्याची भागीदारी सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरली. या खेळपट्टीवर गोलंदाजांना मदत मिळत होती. चेंडू चांगला कॅरी होत होता आणि स्विंग, सीमही होत होता. गोलंदाजीच्या दृष्टीने ही चांगली बाब आहे. खराब सुरूवातीनंतर त्यांच्याकडून इफ्तिकार आणि मसूदने देखील चांगली भागीदारी रचली. त्यांनी शेवटच्या षटकांमध्ये चांगली फलंदाजी केली. मात्र आम्हाला महिती होतं की आमच्याकडे ही धावसंख्या चेस करण्यासाठीची तगडी बॅटिंग लाईन अप आहे.'

विराट आणि पांड्याबद्दल रोहित शर्मा म्हणाला की, 'विराट आणि हार्दिक पांड्या हे अनुभवी खेळाडू आहेत. शांत डोक्यानं खेळून सामना शेवटपर्यंत नेणे खूप आव्हानात्मक असते. आमच्या आत्मविश्वासासाठी ही गोष्ट खूप चांगली आहे. अशा पद्धतीने स्पर्धेची सुरूवात करणे हे खूप महत्वाचे असते. आम्ही जिंकण्याच्या स्थितीतच नव्हतो. ज्या पद्धतीने आम्ही सामना जिंकला ते खूप आनंददायी आहे. विराट कोहलीने ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्याला सलामच! त्याने भारताकडून आतापर्यंतची सर्वात चांगली इनिंग खेळली आहे. मी सर्वांचे आभार मानतो. तुम्ही अशा प्रकारे आम्हाला पाठिंबा देता हे खूप भारी आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Mumbai News: नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Latest Maharashtra News Live Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT