Rohit Sharma Statement About Slog Over  esakal
क्रीडा

Rohit Sharma : स्लॉग ओव्हरची चिंता नाही! बुमराह अन् हर्षलबद्दल कर्णधार रोहित म्हणाला...

अनिरुद्ध संकपाळ

Rohit Sharma Statement About Slog Over : भारताने तिसऱ्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव करत तीन सामन्यांच्या मालिका 2 - 1 अशी जिंकली. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे टार्गेट 19.5 षटकात पार केले. ऑस्ट्रेलियाने पॉवर प्लेमध्ये चांगली फलंदाजी केली होती. त्यानंतर भारतीय फिरकीपटूंनी ऑस्ट्रेलियाच्या धावगतीला चांगला ब्रेक लावला होता. मात्र स्लॉग ओव्हरमध्ये पुन्हा भारताने 52 धावा दिल्या. सामना झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने स्लॉग ओव्हरमधील भारताच्या गोलंदाजीबद्दल वक्तव्य केले.

रोहित शर्मा म्हणाला की, 'भारतासाठी स्लॉग ओव्हरसह काही विभाग डोकेदुखी ठरू शकतात. हर्षल (Harshal Patel) आणि बुमराह (Jasprit Bumrah) दीर्घ काळानंतर आंतरराष्ट्रीय सामने खेळत आहेत. ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीतील फलंदाजांना स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजी करणे कठिण काम असते. मी स्लॉग ओव्हरची जास्त चिंता करत नाहीये. ते एका ब्रेकनंतर खेळत आहेत. त्यामुळे त्यांना लय मिळायला वेळ लागणार. मला आशा आहे की ते त्यांची लय पकडतील.'

हर्षल पटेल आणि जसप्रीत बुमराह दुखापतीतून सावरत दीर्घ काळानंतर आंतरराष्ट्रीय सामना खेळत आहेत. मात्र भुवनेश्वर कुमारचा (Bhuvneshwar Kumar) प्रश्न आहेच. दरम्यान रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेतील कामगिरीवर खूष आहे. तो म्हणला की, 'आम्ही ऑस्ट्रेलियाविरूद्ध चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. सर्वात सकारात्मक गोष्ट म्हणजे विविध खेळाडूंनी मग ते गोलंदाज असो किंवा फलंदाज त्यांनी आपली कामगिरी उंचावली. ज्यावेळी तुम्ही या कामगिरीचं अवलोकन करता त्यावेळी तुम्हाला अशी कामगिरी पाहून आनंद होतो. संघ व्यवस्थापन म्हणून तुम्हाला चांगले वाटते.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT