Rohit Sharma IPL 2023 RCB vs MI esakal
क्रीडा

Rohit Sharma : गेली आठ - सहा महिने झाले आता मला सवय झाली आहे... दारूण पराभव झाल्यावर रोहित हे काय म्हणाला?

अनिरुद्ध संकपाळ

Rohit Sharma IPL 2023 RCB vs MI : आयपीएल 2023 च्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सला रॉयल चॅलेंजर बेंगलोरकडून 8 विकेट्सनी पराभव सहन करावा लागला. मुंबई इंडियन्सने आजच्या सामन्यात ना फलंदाजीत सांघिक कामगिरी केली ना त्यांना प्रभावी गोलंदाजी करता आली. मुंबईने तिलक वर्माच्या नाबाद 84 धावांच्या जोरावर 171 धावांपर्यंत मजल मारली खरी, मात्र विराट कोहलीच्या तडाखेबाज 86 आणि फाफ ड्युप्लेसिसच्या 73 धावांच्या जोरावर आरसीबीने हे आव्हान 16.2 षटकात 2 फलंदाजांच्या मोबदल्यातच पार केले.

या पराभवानंतर हताश झालेल्या रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली. तो म्हणला की, 'आम्ही पहिल्या सहा षटकात चांगली फलंदाजी केली नाही. मात्र तिलक वर्मा आणि इतर काही फलंदाजांनी चांगला प्रयत्न केला. आम्ही गोलंदाजीतही कमी पडलो. ही फलंदाजी करण्यासाठी चांगली खेळपट्टी होती.'

रोहित तिलक वर्माबद्दल बोलताना म्हणाला की, 'तिलक हा एक साकात्मकतेने भरलेला खेळाडू आहे. तो गुणवान खेळाडू देखील आहे. त्याने आज खेळलेले काही फटके पाहते त्याच्याकडे खूप धैर्य असल्याचे जाणवते. तिलक वर्माने आम्हाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली त्याबद्दल त्याला सलामच.'

रोहित शर्माला जसप्रीत बुमराहची कमतरता जाणवते या संदर्भात प्रश्न विचारला असता तो म्हणाला, 'गेल्या आठ - सहा महिन्यापासून मला जसप्रीत बुमराहशिवाय खेळायची सवय झाली आहे. नक्कीच हा वेगळा संघ आहे. मात्र कोणाला तरी पुढाकार घेतला पाहिजे. आम्ही त्याचा आसरा फारकाळ घेऊ शकत नाही. दुखापती होणे आमच्या हातात नाही. याबाबत आम्ही फार काही करू शकत नाही. इतर खेळाडू देखील गुणवान आहेत. आपण त्यांना साथ देणे गरजेचे आहे. हा हंगामातील फक्त पहिला सामना होता. आम्ही पुनरागमन करू.'

(Sports Latest News)

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसकडून बारामती पोटनिवडणुकीची तयारी, जय पवार म्हणाले, बिनविरोधसाठी आमचा प्रयत्न पण...

IPL 2026 : शाsssणा... Rohit Sharma ने कुलदीप, लोकेश यांना 'मामू' बनवलं; प्रसंग सांगताना हिटमॅन खळखळून हसला Video

Latest Marathi News Live Update : मुंबईहून 18 टन ऑटो LPG संभाजीनगरमध्ये जाणार

MI vs DC Live : सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, नमन धीरने मुंबई इंडियन्सची लाज वाचवली; दिल्लीच्या गोलंदाजांसमोर इतरांची शरणागती

"मी पैशांसाठी बिग बॉस केलं" लपंडाव फेम रुपालीचा धक्कादायक खुलासा ; म्हणाली..

SCROLL FOR NEXT