rohit sharma trolled independence day sakal
क्रीडा

Rohit Sharma: स्वातंत्र्यदिनी रोहित शर्माने केली मोठी चूक, चाहत्यांनी केले ट्विटरवर ट्रोल

रोहित शर्माने फोटोमध्ये हातात तिरंगा पकडला आहे, मात्र यामध्ये त्याने मोठी चूक केली.

Kiran Mahanavar

Rohit Sharma Trolled Independence Day : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या ब्रेकवर आहे. 27 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया कपमध्ये परतणार आहे. जिथे रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करेल. मात्र यावेळी रोहित शर्मा त्याच्या एका पोस्टमुळे चर्चेत असून सोशल मीडियावर तो ट्रोल होत आहे. 15 ऑगस्टला रोहित शर्माने चाहत्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. हातात तिरंगा घेऊन त्याने एक फोटो पोस्ट केला त्यामध्ये चाहत्यांना चूक आढळून आली. सोशल मीडियावर फोटो झूम करताना रोहित शर्माला प्रचंड ट्रोल करत आहे.

रोहित शर्माच्या फोटोचा उल्लेख करताना चाहत्यांनी लिहिले की हॅप्पी फोटोशॉप कॅप्टन. काही लोकांनी लिहिले की या व्यक्तीकडे लाखो रुपये आहेत, पण तो ध्वज खरेदी करू शकला नाही आणि त्याला फोटोशॉप करावे लागले. केवळ कर्णधार रोहित शर्माच नाही तर विराट कोहली, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, केएल राहुलसह टीम इंडियाच्या इतर स्टार खेळाडूंनीही सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करून चाहत्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

भारतीय संघ सध्या झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर असून 18 ऑगस्टपासून केएल राहुलच्या नेतृत्वाखाली तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. मात्र, रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासह अनेक वरिष्ठ खेळाडू या मालिकेचा भाग नसून ते थेट आशिया चषक स्पर्धेत परतणार आहेत. आशिया चषक यूएईमध्ये खेळवला जात असून तो टी-20 फॉरमॅटमध्ये खेळला जाईल. 27 ऑगस्टपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे, मात्र टीम इंडियाचा प्रवास 28 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. भारताचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे.

आशिया कपसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दीपक हुड्डा, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजार पुन्हा तेजीत, MCX चा शेअर 10,000 रुपयांवर; जाणून घ्या कोणते शेअर्स वाढले

Constitution Day: संविधान दिन विशेष मूळ संविधानाची प्रत, दुर्मिळ ग्रंथ, बाबासाहेबांच्या नोट्स ‘सिद्धार्थ’ने जपल्या खाणाखुणा

Latest Marathi News Live Update : नागपूर महानगरपालिका प्रारूप मतदार यादीसाठी मुदत वाढीची मागणी

TET Paper Leak : टीईटी पेपरफुटीचा धागा बिहारपर्यंत; कोल्हापूर कनेक्शन उघड, पोलिसांच्या मौनामुळे संशय अधिक गडद!

CM Yogi Adityanath: मोबाईलवर दिसणार आपले शेत आणि घर! योगी सरकार नागरिकांना देणार मोठा दिलासा

SCROLL FOR NEXT