Mumbai Indians Rohit Sharma Most Successful Captain IPL 
क्रीडा

IPL: 2013 मध्ये एका विजयासाठी रडत होती मुंबई... रोहितने कर्णधारपदाची धुरा संभाळली अन्...

रोहितने कर्णधारपदाची धुरा सांभाळताच संघाचे नशीब बदलले अन् आज....

Kiran Mahanavar

Mumbai Indians Rohit Sharma Most Successful Captain IPL : जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा थरार 31 मार्चपासून सुरू होत आहे.  इंडियन प्रीमियर लीगला 15 वर्षे पूर्ण झाली आहेत. 31 मार्चपासून सुरू होणारी 16व्या वर्षाला सुरुवात होईल. या 15 वर्षांमध्ये चाहत्यांनी जिथे महेंद्रसिंग धोनीची फॅन फॉलोइंग पाहिली आहे, तिथे त्यांनी रोहित शर्माला या लीगचा सर्वात यशस्वी कर्णधार बनतानाही पाहिले आहे.

रोहित शर्मा आयपीएलमधील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने एकूण 5 आयपीएल जेतेपदे जिंकली आहेत. रोहित शर्मा 2013 पासून मुंबईची धुरा सांभाळत आहेत.

पण रोहित शर्माला मुंबई इंडियन्सचा कर्णधार का करण्यात आले हे तुम्हाला माहिती आहे का? भारताचा माजी खेळाडू अनिल कुंबळेने याबाबत एक मजेशीर खुलासा केला आहे. जेव्हा मुंबई इंडियन्स संघ कठीण परिस्थितीतून जात होता आणि रोहितने कर्णधारपदाची धुरा सांभाळताच संघाचे नशीब बदलले.

कुंबळे म्हणाला, '2013 मध्ये जेव्हा मुंबई संघाला सलग 5 पराभव पत्करावे लागले होते, तेव्हा मी रोहित शर्माला विचारले होते की त्याला संघाची धुरा सांभाळायची आहे का? रोहितने हो असे उत्तर दिले आणि तिथून मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्माची यशोगाथा सुरू झाली. दोघांनी पुन्हा मागे वळून पाहिले नाही.

रोहित शर्माने कर्णधारपदाची सूत्रे हाती घेताच मुंबई इंडियन्सचे नशीब बदलले. आजही तो इंडियन प्रीमियर लीगचा सर्वात यशस्वी संघ आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने 5 वेळा या ट्रॉफीवर कब्जा केला आहे. रोहितने 2013 मध्ये मुंबई संघाला पहिल्यांदा चॅम्पियन बनवले आणि त्यानंतर 2015 आणि 2017 मध्येही ट्रॉफी जिंकण्यात यश मिळविले.

2019-2020 मध्ये रोहित शर्माच्या संघाने या लीगमध्ये बॅक टू बॅक ट्रॉफी जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले. मात्र शेवटचा हंगाम मुंबईसाठी खूपच खराब होता. संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर राहिला. गेल्या मोसमात मुंबई संघाने 14 पैकी केवळ 4 सामने जिंकले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident: ताम्हिणी घाटातल्या गूढ अपघाताचा उलगडा… कोकणातून हॉटेल चालकाचा फोन ठरला टर्निंग पाईंट! नाहीतर...

Kolkata Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने कोलकाता हादरले; लोक घाबरून घरं सोडून पळाले; बांगलादेशातही बसले हादरे

Television Day 2025: स्क्रीनवरचे डाग होतील गायब! ‘या’ 3 उपायांनी करा टीव्हीची परफेक्ट स्वच्छता

Latest Marathi News Live Update : कोळसा घोटाळ्याप्रकरणी ईडीची मोठी कारवाई: हावडा-दुर्गापूरमध्ये २४ ठिकाणी छापे

Ashes 2025 England vs Australia : खरोखरची राख असलेली 'अ‍ॅशेस ट्रॉफी' आता कुठं आहे? त्यात नेमकी कशाची राख आहे? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT