rohit sharma wife ritika sajdeh  sakal
क्रीडा

Rohit Sharma Wife : तुझी कॅप्टनशिप गेली तर? रोहितच्या बायकोनं लावला तोंडाला हात

रोहित शर्माची विकेट पडल्यानंतर पत्नी रितिकाची रिॲक्शन व्हायरल

Kiran Mahanavar

Rohit Sharma Wife Ritika Sajdeh : टीम इंडियाने आशिया चषकाच्या सुपर फोरमध्ये प्रवेश केला आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर बुधवारी झालेल्या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने हाँगकाँगचा 40 धावांनी पराभव केला. या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी केली. कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात चांगली सुरुवात केली, मात्र त्याला मोठ्या धावसंख्या करता आली नाही. रोहित शर्मा एक मोठा शॉट खेळण्याच्या नादात आऊट झाला. त्यावर पत्नी रितिका सजदेहही मैदानात होती आणि तिची रिॲक्शन व्हायरल होत आहे.

कर्णधार रोहित शर्माने केवळ 13 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकारासह 21 धावा केल्या. पाचव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रोहित शर्मा लाँग शॉट खेळायला गेला तेव्हा तो झेलबाद झाला. यानंतर रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहची प्रतिक्रिया टीव्ही स्क्रीनवर दाखवण्यात आली. रोहित बाद झाल्यानंतर रितिका निराश दिसली आणि तिने चेहरा झाकला. हा फोटो सोशल मीडियावर लगेच व्हायरल झाला. चाहते यावर कमेंट करताना दिसले. एका चाहत्याने त्यावर कमेंट करत लिहिले की, ''रोहितची कॅप्टनशी जाण्याच्या चिंतेत...'' टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी रितिका अनेकदा मैदानात हजर असते. आशिया कप सुरू झाला तेव्हा रोहित शर्माचे कुटुंब दुबईत नव्हते, पण पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर ते येथे आले होते.

रोहित शर्माने आपल्या आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमधील 3500 धावा पूर्ण केल्या आहेत. ही कामगिरी करण्यासाठी रोहित शर्माने 134 सामने घेतले. विशेष म्हणजे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा रोहित हा पहिलाच फलंदाज ठरला आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वांधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल 3497 धावा करून दुसऱ्या स्थानावर आहे. तर भारताचा विराट कोहली 101 सामन्यात 3354 धावा करून तिसऱ्या स्थानावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Transaction Charges: 2000 रुपयांपेक्षा अधिकच्या यूपीआय व्यवहारांवर 0.4 टक्के टॅक्स; 'या' ग्राहकांसाठी मात्र UPI सेवा मोफत

''तर तोंड काळं करायची वेळी आली असती'', राज ठाकरेंच्या 'त्या' टीकेला CM फडणवीसांनी दिलं प्रत्युत्तर...

IND vs AFG 2nd T20I: 'Toss' चा 'BOSS'! श्रेयस अय्यरने नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; वरूण चक्रवर्तीला नेमकं काय झालं? BCCI म्हणते...

Pune News : पुण्याच्या चारीही दिशांना स्वतंत्र डंबर प्लांट उभारा; महापौर नागपुरे यांचे आयुक्तांना पत्र

Hingoli News : चोंडीत शक्तिपीठ महामार्गाची मोजणी रोखली! ‘जमीन गेली तर जगायचे कसे?’ वृद्ध महिला शेतकऱ्यांचा आक्रोश; तुषार जाधव यांचा पालकमंत्र्यांना थेट इशारा

SCROLL FOR NEXT