Rohit Sharma Will Leave For England With Rishabh Pant Shreyas Iyer And R Ashwin  ESAKAL
क्रीडा

टीमसोबत न दिसलेला कर्णधार रोहित 'या' दिवशी होणार इंग्लंडला रवाना

अनिरुद्ध संकपाळ

मुंबई : भारतीय कसोटी संघ आज पहाटे इंग्लंडमध्ये होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठी रवाना झाला. मात्र संघासोबत संघाचा कर्णधार रोहित शर्मा दिसला नाही. यामुळे सोशल मीडियावर 'रोहित शर्मा गेला कुणीकडे' अशी चर्चा सुरू झाली होती. त्याच्या दुखापतीबाबत देखील शंका व्यक्त केली जात होती. तो इंग्लंडमधील कसोटी सामन्याला मुकरणार का अशी एक भीती चाहत्यांच्या मनात होती. (Rohit Sharma Will Leave For England With Rishabh Pant Shreyas Iyer And R Ashwin)

मात्र स्पोट्स टुडेने दिलेल्या वृत्तानुसार रोहित शर्मा पूर्णपणे फिट असून तो लकरच इंग्लंडला रवाना होणार आहे. रोहित काही वनडे संघातील खेळाडू आणि बंगळुरूमध्ये असलेल्या कसोटीतील खेळाडूंबरोबर 20 जूनला इंग्लंडसाठी रवाना होणार आहे. ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर हे सध्या दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी 20 मालिकेत खेळत आहेत. हे दोन्ही खेळाडू इंग्लंडमध्ये होणाऱ्या कसोटी सामन्यात खेळण्याऱ्या भारतीय संघात देखील आहेत. याचबरोबर ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन देखील आज रवाना झालेल्या संघातील खेळाडूंबरोबर दिसला नव्हता. हे सर्वजण 20 जूनला आफ्रिकेविरूद्धची मालिका संपल्यानंतर इंग्लंडला रवाना होण्याची शक्यता आहे.

भारत 24 जून पासून लिसिस्टशार विरूद्ध चार दिवसांचा सराव सामना खेळणार आहे. तर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाील भारताचा टी 20 संघ आर्यलंडमध्ये 26 जून आणि 28 जूनला दोन टी 20 सामने खेळणार आहे. गेल्या वर्षी भारताने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा दौरा केला होता. त्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-1 अशी आघाडी घेतली होती. मात्र पाचवा सामना कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आला. आता हा सामना येत्या जुलै महिन्यात खेळवला जाणार आहे. आता भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT