Rohit Sharma
Rohit Sharma 
क्रीडा

हिटमॅन फिटनेसची अपडेट्स आली; कधी उतरणार मैदानात?

सुशांत जाधव

नवी दिल्ली : भारतीय वनडे आणि टी-20 संघाचा कर्णधार रोहित शर्मा दुखापतीतून सावरला आहे. रोहित शर्मा डाव्या पायाच्या हॅमस्ट्रिंग (स्नायू दुखापत) च्या दुखापतीनं त्रस्त होता. या दुखापतीमुळे त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्याला मुकावे लागले होते. आता तो पुन्हा मैदानात उतरण्यास सज्ज झाला आहे. पुढच्या महिन्यात वेस्ट इंडीजचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून रोहित शर्मा कमबॅक करेल.

रोहित शर्माला (Rohit Sharma) दक्षिण आफ्रिका (South Africa) दौऱ्यापूर्वीच वनडे संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली होती. याशिवाय कसोटी संघाचे उप कर्णधारपदही त्याच्याकडे दिले होते. पण संघ दौऱ्याला रवाना होण्यापूर्वीच रोहितच्या दुखापतीनं डोकं वर काढलं. त्याला कसोटीसह वनडे मालिकेलाही मुकावे लागले. त्याच्या अनुपस्थितीत लोकेश राहुलकडे (KL Rahul) वनडे कॅप्टन्सी देण्यात आली आहे.

बीसीसीआयच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत रोहित शर्माच्या रिहॅबिलिटेशनची प्रक्रिया उत्तम प्रकारे सुरु आहे. तो वेस्ट इंडीज संघा विरुद्धच्या मालिकेत तो खेळताना दिसेल. अहमदाबादमध्ये 6 फेब्रुवारी रोजी भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात पहिला वनडे सामना खेळवण्यात येणार आहे. तीन वनडे मालिकेनंतर तीन टी-20 सामनेही खेळवण्यात येतील.

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका 12 फेब्रुवारीपर्यंत रंगणार आहे. त्यानंतर 15 ते 20 फेब्रुवारी दरम्याने टी-20 सामन्यांची मालिका नियोजित आहे. बीसीसीआयच्या नियमालीनुसार, दुखापतीमुळे संघाबाहेर पडल्यानंतर खेळाडूला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत फिटनेस सिद्ध करावा लागतो. याठिकाणी ग्रीन सिग्नल मिळाल्यावरच त्याची टीम इंडियात वर्णी लागते. रोहित या प्रक्रियेत फिट असल्याचे समोर येत असून तो पुन्हा मैदानात उतरण्यास सज्ज असल्याचे बोलले जात आहे.

विराट कोहलीनं कसोटी संघाचे नेतृत्व सोडल्यानंतर युवा खेळाडूकडे टीम इंडियाची मदार देण्यापूर्वी रोहित शर्माच्या नावाला पसंती मिळण्याची शक्यता आहे. किमान चार पाच वर्षी रोहित शर्मा वनडे आणि टी 20 सह कसोटी संघाची धूरा सांभाळताना दिसू शकतो. जर ही जबाबदारी त्याला मिळाली तर भविष्यात त्याला फिटनेसवर अधिक भर द्यावा लागेल. रोहित शिवाय लोकेश राहुल कसोटी संघाच्या नेतृत्वाच्या शर्यतीत आहे. या दोघांशिवाय सरप्राईजरित्या रिषभ पंतच्या गळ्यातही कसोटी संघाच्या कॅप्टन्सीची माळ पडू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT