UEFA European Football Championship sakal
क्रीडा

UEFA European Football Championship : रुमानियाचा विजयी धडाका;युरो करंडक फुटबॉल स्पर्धेत युक्रेनला तीन गोलने नमविले

युरो करंडक फुटबॉल स्पर्धेत रुमानियाचा संघ मागील वेळेस पात्र ठरला नव्हता, यावेळेस त्यांनी धडाकेबाज पुनरागमन साजरे करताना युक्रेनवर सोमवारी ३-० असा दणदणीत विजय नोंदविला.

सकाळ वृत्तसेवा

म्युनिक : युरो करंडक फुटबॉल स्पर्धेत रुमानियाचा संघ मागील वेळेस पात्र ठरला नव्हता, यावेळेस त्यांनी धडाकेबाज पुनरागमन साजरे करताना युक्रेनवर सोमवारी ३-० असा दणदणीत विजय नोंदविला. ई गटातील या लढतीत रुमानियाने पूर्ण वर्चस्व राखले. त्यांच्यासाठी कर्णधार निकोलाय स्टानसियू, राझवान मारिन व डेनिस ड्रागस यांनी प्रत्येकी एक गोल केला. युद्धग्रस्त युक्रेनने तीन वर्षांपूर्वीच्या युरो करंडकात उपांत्यपूर्व फेरी गाठली होती, यावेळी गट साखळीतील पहिल्या लढतीत त्यांना प्रभाव पाडता आला नाही.

कर्णधार निकोलाय स्टानसियू याने सणसणीत फटक्यावर रुमानियाने २९व्या मिनिटास गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडली. युक्रेनच्या गोलरक्षकाच्या गोलकिकवर रुमानियाच्या डेनिस मॅन याने चेंडू नियंत्रित केला. त्याने कर्णधारास चेंडू पुरविला. यावेळी ३१ वर्षीय खेळाडूने लाजबाव फटक्यावर संघाला आघाडी मिळवून दिली.

विश्रांतीनंतरच्या खेळात रुमानियाने चार मिनिटांत दोन गोल नोंदविल्यानंतर युक्रेनच्या आव्हानातील हवाच निघाली. ५३व्या मिनिटास राझवान मारिन याने २२ मीटरवरील झंझावाती फटक्यावर केलेला गोल डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. नंतर ५७व्या मिनिटास प्रतिहल्ल्यावर डेनिस ड्रागस याने दूरवरील फटक्यावर प्रेक्षणीय गोल नोंदविला. यावेळीही डेनिस मॅन याचे असिस्ट निर्णायक ठरले. सामन्याच्या इंज्युरी टाईममध्ये बदली खेळाडू रोमन यारेमचुक याचा जोरदार फटका क्रॉसबारला आपटल्यामुळे पिछाडी कमी युक्रेनची अखेरची संधीही हुकली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT