Ronaldo Vs Messi sakal
क्रीडा

Ronaldo Vs Messi : पुन्हा मेस्सीचं ठरला वरचढ ! 2 गोल करूनही रोनाल्डो पडला फिका

मेस्सी-एम्बापे-नेमार असे स्टार असलेल्या पीएसजीकडून मेस्सीने सुरुवातालीच लाजवाब मैदानी गोल केला.

सकाळ वृत्तसेवा

रियाध : कतार विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेनंतर सर्वात चर्चेचा विषय ठरलेल्या लिओनेल मेस्सी विरुद्ध ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यातील स्कोअर रोनाल्डो २ मेस्सी १ असा झाला; परंतु रोनाल्डोच्या सौदी ऑल स्टार संघाला मेस्सीच्या पीएसजीविरुद्ध ४-५ अशी हार स्वीकारावी लागली.

२०२० नंतर मेस्सी आणि रोनाल्डो एकमेकांविरुद्ध खेळले. त्यामुळे या लढतीची उत्सुकता कमालीची होती. रोनाल्डो आता सौदीच्या क्लबशी करारबद्ध आहे, तर पीएसजी या क्लबची मालकी सौदीतील अरब उद्योगपती नसीर अल खैलेफी यांच्याकडे आहे. त्यामुळे आजची ही मैत्रीपूर्ण लढत शक्य झाली. भारताचे सुपरस्टार अभिनेते अमिताभ बच्चन सामन्याचे प्रमुख पाहुणे होते.

मेस्सी-एम्बापे-नेमार असे स्टार असलेल्या पीएसजीकडून मेस्सीने सुरुवातालीच लाजवाब मैदानी गोल केला. त्यानंतर त्याने एम्बापेला अचूक पास दिला, परंतु त्याला गोल करता आला नाही. नेमारने तर पेनल्टी वाया घालवली.

रोनाल्डोने मात्र पेनल्टीवर संधी साधल्यावर दुसरा गोल आपल्या कौशल्यावर साधला. पीएसजीच्या बर्नाटला रेड कार्ड मिळाल्यामुळे पीएसजीचा संघ १० खेळाडूंसहच खेळत होता. एम्बापेने अखेर पेनल्टीवर गोल केल्यानंतर ६० व्या मिनिटानंतर त्याच्यासह मेस्सी-नेमार आणि रोनाल्डो या सर्वांना विश्रांती देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parth Pawar meets Sharad Pawar : पार्थ पवारांनी शरद पवारांची भेट घेतली काय घडलं नेमकं...

Bigg Boss Marathi 6 Video : "आता बास झालं" डॉन प्रभूला रितेशचा सज्जड दम ; प्रोमो चर्चेत

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार विधानभवनात दाखल

Students Poisoned During Trip : अक्कलकोटहून कोल्हापुरात सहलीसाठी आलेल्या मुलींना विषबाधा, ६ ते ७ जणांना बाधा

एपस्टीन फाइल्समध्ये जोहरान ममदानी यांच्या आईचंही नाव; मीरा नायर पार्टीत कशासाठी गेल्या होत्या?

SCROLL FOR NEXT