ross taylor statement about india head coach rahul dravid  
क्रीडा

'संपूर्ण जगात 4000 वाघ असतील, पण राहुल द्रविड फक्त एक' - रॉस टेलर

सामान्य लोकांना वाघ पाहण्यापेक्षा द्रविडमध्ये जास्त रस होता आणि त्याचे फॅन फॉलोइंग पाहून त्यांना आश्चर्य वाटले.

Kiran Mahanavar

Rahul Dravid : न्यूझीलंडचा माजी कर्णधार रॉस टेलरने या वर्षाच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. अनेक वर्षे किवी संघासाठी मधल्या फळीचा कणा असलेला रॉस टेलर पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. टेलरने 'ब्लॅक अँड व्हाईट' नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. पुस्तकामध्ये त्यांनी भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी संबंधित एक प्रसंग लिहिला आहे. टेलर आणि राहुल दोघेही वाघ पाहण्यासाठी राजस्थानमधील राष्ट्रीय उद्यानात गेले होते. यावेळी टेलरने असेही सांगितले की, सामान्य लोकांना वाघ पाहण्यापेक्षा द्रविडमध्ये जास्त रस होता आणि त्याचे फॅन फॉलोइंग पाहून आश्चर्य वाटले.

टेलरने त्याच्या आत्मचरित्रात म्हटले आहे की, मी द्रविडला विचारले, तुम्ही किती वेळा वाघ पाहिला आहे? तो म्हणाला, मी कधीही वाघ पाहिला नाही. मी उद्यानात 21 वेळा आलो आहे आणि एकही वाघ पाहिला नाही. टीव्हीवर काही बेसबॉल खेळला जात होता जो त्याला बघायचा होता म्हणून तो आमच्यासोबत दुपारच्या सफारीला आला नाही. आमच्या ड्रायव्हरला एका सहकाऱ्याचा रेडिओ कॉल आला की त्याने टी नावाचा प्रसिद्ध वाघ पाहिला आहे. हे ऐकून द्रविड रोमांचित झाला कारण 21 सफारीमध्ये वाघ न दिसला आणि अर्ध्या तासात त्याने 22 व्या सफारीत वाघ दिसला.

टेलरने पुढे लिहिले की, आम्ही इतर वाहनांजवळ जंगलात उभे होतो. वाघ 100 मीटर दूर एका कड्यावर होता. जंगलात वाघ दिसल्याने आम्हाला आनंद झाला, पण इतर वाहनांतील लोकांनी लगेच आपले कॅमेरे राहुल द्रविडकडे वळवले. त्याला पाहण्यासाठी ते जितके उत्सूक होते तितकेच आम्ही वाघ पाहण्यासाठी होतो. जगात बहुधा 4000 वाघ आहेत, पण राहुल द्रविड हा एकच आहे.

राहुल द्रविड आणि रॉस टेलर 2008 ते 2011 या काळात आयपीएलच्या चार सीझनमध्ये एकत्र खेळले होते. दोघेही 2008 ते 2010 पर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा भाग होते, याशिवाय दोघेही राजस्थान रॉयल्सकडून खेळले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : मोठी बातमी! तेजस्वी यादव यांच्याविरोधात गडचिरोलीत गुन्हा दाखल

TikTok India News: भारतात पुन्हा 'टिकटॉक' सुरू होणार? ; वेबसाइट सुरू झाल्याचे समोर आल्याने चर्चांना उधाण!

Ajit Pawar: 'चाकरमानी’ नव्हे; ‘कोकणवासीय’ म्हणायचे! अजित पवारांची जागवला स्वाभिमान; शासन लवकरच परिपत्रक काढणार

Manoj Jarange Patil: मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ उपसमितीचं पुनर्गठन; राधाकृष्ण विखेंकडे अध्यक्षपद

Georai News : पाझर तलावात उतरल्याने बुडून शेतमजूराचा मृत्यू; दिवसभर शोध घेऊनही मृतदेह मिळाला नाही

SCROLL FOR NEXT