virat kohli century vamika birthday  esakal
क्रीडा

विराटकडून चाहत्यांबरोबरच वामिकाचीही निराशा

अनिरुद्ध संकपाळ

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटीत पहिल्या दिवशी भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) एकाकी झुंज देत भारताला २०० पार पोहचवले. मात्र मुलगी वामिकाच्या वाढदिवसादिवशी (Vamika Birthday) आपला शतकांचा दोन वर्षांचा दुष्काळ संपवण्यापासून विराट चुकला.

विराट कोहली तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ७९ धावा करुन बाद झाला. भारताकडून विराट कोहलीनेच सर्वाधिक धावा केल्या. ज्यावेळी विराट कोहलीने ७० पार केली त्यावेळी भारताच्या फक्त ३ विकेट राहिल्या होत्या. भारताचे रथी महारथी पॅव्हेलियनमध्ये गेले होते. मात्र विराट एकटाच मैदानात झुंजत होता. त्याचे हे झुंजणे पाहून आपल्या मुलीच्या वाढदिवसादिवशी शतकी खेळी करण्यासाठी तो अटोकाट प्रयत्न करत असल्याचे जाणवत होते. (Virat Kohli Century)

मात्र दुसऱ्या बाजूने त्याला साथ मिळत नव्हती शेवटची आशा शार्दुल ठाकूरही १२ धावा करुन बाद झाला होता. आता बुमराह, शमी आणि उमेश यादव हे गोलंदाज उरले होते. तरीही विराट आपल्या शतकापासून फक्त २१ धावा दूर होता. त्यामुळे विराट आपले शतक पार करेल असे चाहत्यांना वाटत होते मात्र विराट पुन्हा एकदा रबाडाचा बाहेरचा चेंडू खेळण्याच्या नादात ७९ धावांवर बाद झाला आणि शतकाची प्रतिक्षा अजून लांबली.

विराट कोहली बाद झाल्यानंतर भारताचा पहिला डाव २२३ धावात अटोपला. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक ७९ धावा केल्या. तर चेतेश्वर पुजाराने ४३ धावा करुन विराटला चांगली साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र इतर फलंदाजांनी निराशा केली. ऋषभ पंत २७ धावा करुन बाद झाला. तर अजिंक्य रहाणेची गाडी ९ धावांचा पुढे गेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka Crisis : कर्नाटकात मोठा राजकीय भूकंप! DK शिवकुमार होणार नवे मुख्यमंत्री? लिंगायत, दलित, OBC सह अल्पसंख्याक नेत्यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची माळ

Pakistan Defence Minister: ''आमचे पूर्वज हिंदूच, पाकिस्तानमध्ये चुकीचा इतिहास शिकवला जातोय'' पाकच्या संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान

“आरारारा खतरनाक…” ‘मुळशी पॅटर्न २’ लवकरच येणार, प्रवीण तरडे म्हणाले...

Ebola Virus: आफ्रिकेनंतर भारतातही इबोलाची धास्ती! काय आहे हा जीवघेणा व्हायरस, कोणती आहेत लक्षणं? जाणून घ्या सविस्तर माहिती एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update : शिवसैनिकांनी विधान परिषदेची मागणी करणे काही चुकीचे नाही : भरत गोगावले

SCROLL FOR NEXT