Champions League Final  Sakal
क्रीडा

ब्रिटन म्हणते, Champions League Final रशियात नकोच!

सुशांत जाधव

रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे जगभरातील वातावरण तापले आहे. या दोन्ही राष्ट्रांतील वादाचा फटका क्रीडा जगतालाही बसण्याची चिन्हे आहेत. ब्रिटन सरकारने फुटबॉल चॅम्पियन्स लीग स्पर्धेची फायनल रशिया बाहेर खेळवण्याची मागणी केली आहे. युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशननं ( Union of European Football Associations/UEFA) रशियात नियोजित फायनल लढतीसंदर्भात पुनर्विचार करावा, असे ब्रिटनने म्हटले आहे.

ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉनसन (Boris Johnson) यांनी आगामी चॅम्पियन लीग फायनलसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला करु नये, असे आवाहनही त्यांनी व्लादिमिर पुतिन यांना केले आहे. चॅम्पियन्स लीग 2022 स्पर्धेतील फायनल सामना 28 मे रोजी रशियातील सेंट पीटर्सबर्ग (Saint Petersburg) च्या क्रेस्टोवस्की स्टेडियमवर (Krestovsky Stadium) नियोजित आहे.

बोरिस जॉनसन यांनी संसदेतील भाषणात म्हटले आहे की, व्लादिमिर पुतिन युक्रेन विरुद्ध युद्ध करण्याच्या तयारीत आहेत. ते आपल्या मतावरु अडून बसल्याचे दिसत आहे. आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करत पुतिन रशियाचे संकट वाढवून ठेवले आहे, असा उल्लेखही बोरिस यांनी केला. एका स्वतंत्र्य राष्ट्रावर आक्रण करणाऱ्या रशियात फुटबॉल स्पर्धा खेळवण्याची परिस्थिती नाही. आम्ही त्यांची आर्थिक कोंडी करणार आहोत, असेही बोरिस यांनी सांगितले. दोन्ही देशातील तापलेल्या वातावरणात ब्रिटनशिवाय फ्रान्स, जर्मनी आणि अमेरिकेन उघडपणे रशियाला विरोध करत युक्रेनला पाठिंबा दर्शवला आहे.

UEFA ला यापूर्वीही चॅम्पियन्स लीग फायनलचे ठिकाण बदलण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. तोकोनामुशे तुर्कीत होणारी फायनल पोर्तुगालमध्ये घेण्याची वेळ त्यांच्यावर ओढावली होती. आता रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीवरुन स्पर्धेतील फायनलसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात येत आहे. आयोजकांकडून यावर अद्याप कोणतीही भूमिका घेण्यात आलेली नाही.

विशेष म्हणजे रशियन गॅस कंपनी Gazprom ही चॅम्पियन्स लीग स्पर्धेची मुख्य स्पॉन्सर आहे. त्यामुळे रशियातील फायनल दुसरीकडे शिफ्ट करणे आयोजकांसाठी सहज शक्य नाही. ग्रुपमध्ये आघाडीच्या 16 संघामध्ये 4 टीम ब्रिटनच्या आहेत त्यामुळेच ब्रिटनकडून यासंदर्भात दबाव टाकण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT