russian athlete fascist gesture roman salute european karting championship video goes viral  
क्रीडा

संतापजनक! रशियन खेळडूचा 'फॅसिस्ट सलाम'; हसतानाचा व्हिडिओ व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

रशियाने युक्रेनवर केल्याल्या आक्रमनानंतर जगभरातून रशियावर निर्बंध लादण्यात आले आहेत. यातच एक संपापजनक बाब समोर आली आहे. युरोपियन कार्टिंग चॅम्पियनशिपमध्ये पुरस्कार वितरणाच्या वेळी इटालियन राष्ट्रगीत वाजवले जात असताना एका रशियन खेळाडूने फॅसिस्ट सलाम केल्याचा प्रकार समोर आला आहे, या कृतीनंतर तो मोठ्याने हसताना दिसत आहे. या प्रकारमुळे जगभरात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

आर्टेम सेवेरिउखिन (Artem Severiukhin) हा एक रशियन ड्रायव्हर आहे. सध्या रशियावर आंतराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागावर बंदी घालण्यात आल्याने तो त्याच्या देशाचे प्रतिनिधित्व करू शकत नाही, म्हणून त्याने इटालियन ध्वजाखाली या स्पर्धेत भाग घेतला होता.

सेवेरिउखिनचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो रोमन सॅल्युट करताना दिसत आहे, ज्याला जगभरात फॅसिस्ट सलाम मानले जाते. हा सलाम केल्यानंतर "Il Canto degli Italiani" वाजत असताना तो हसताना देखील या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

20 व्या शतकात, हा सलाम फॅसिस्ट गटांसाठी अभिवादन म्हणून वापरला जात असे. इटलीचे माजी पंतप्रधान बेनिटो मुसोलिनी यांच्या काळात ते राजवटीचा अधिकृत भाग बनला होता. सेवेरिउखिनला रशियन मोटरस्पोर्ट एसएमपी रेसिंग प्रोग्रामकडून मदत करण्यात येते, तसेच त्याचे मुख्य प्रायोजक हे देखील रशियन गॅझप्रॉम हे आहेत.

या दरम्यान फेडरेशन इंटरनॅशनल डी ल'ऑटोमोबाईल (एफआयए) ने रशियन आणि बेलारशियन ड्रायव्हर्सना युक्रेनमधील युद्धादरम्यान त्यांच्या स्वत:च्या देशांच्या ध्वजाखाली आंतरराष्ट्रीय सीरीज स्पर्धांमध्ये खेळण्यास मनाई केली होती.

रशियाने 24 फेब्रुवारी रोजी युक्रेनवर संपूर्ण आक्रमण सुरू केले. तेव्हापासून रशियन सैन्य युक्रेनच्या शहरांवर शेल, बॉम्ब आणि हवाई हल्ले करत आहेत. युक्रेनमधील आक्रमकतेमुळे रशियावर विविध देश आणि जगप्रसिध्द कंपन्या आणि ब्रँड्सनी निर्बंध लादले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin: लाडक्या बहिणींसाठी २०० कोटींची तरतूद; राज्यात १० मॉल उभे करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

US Birth Tourism: गर्भधारणेदरम्यान अमेरिकेत प्रवास करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा! यूएस दूतावासाकडून व्हिसा रद्द करण्याचा इशारा, कारण काय?

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणात १९ तारखेला दोषारोप निश्चिती? सुनावणीत नेमकं काय घडलं?

Pune News : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात ३ हजार कोटींचा विकासधडाका; सोमवारी मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत मोठा कार्यक्रम!

Latest Marathi News Live Update: पवईत आढळले दोन अजगर, रेस्क्यू टीम घटनास्थळी

SCROLL FOR NEXT