Russian Roman Abramovich has decided to sell Chelsea
Russian Roman Abramovich has decided to sell Chelsea  esakal
क्रीडा

रशियन मालकाने चेल्सी क्लब विकायला काढला; मिळणारा फायदा युक्रेनसाठी दान

सकाळ डिजिटल टीम

रशियन उद्योगपती रोमन अ‍ॅब्रामोव्हिच (Roman Abramovich) यांनी युरोपमधील प्रसिद्ध फुटबॉल क्लब चेल्सी (Chelsea FC) विकायला काढल्याचे सांगितले. त्यांनी याबाबतची माहिती आपल्या ट्विटर हँडलवरून दिली. जेव्हापासून रशियाने युक्रेनवर हल्ला (Russia Ukraine Crisis) चढवला आहे. तेव्हापासून ब्रिटनमध्ये रशियावर कडक निर्बंध लादण्यास सुरूवात केली होती. त्याचाच भाग म्हणून ब्रिटीश खासदाराने चेल्सीचे रशियन मालक रोमन अ‍ॅब्रामोव्हिच यांच्याकडून चेल्सीचा मालकी हक्क काढूण घेऊन त्यांची संपत्ती जप्त करण्याची मागणी केली होती.

दरम्यान, रोमन अ‍ॅब्रामोव्हिच यांनी आपल्या अधिकृत वक्तव्यात सांगितले की, 'माध्यमांमध्ये चेल्सी फुटबॉल क्लब (Chelsea Football Club) बाबतच्या मालकी हक्काबाबत येत असलेल्या बातम्यांबाबत मी खुलासा करू इच्छितो. मी याआधीही सांगितले आहे की, मी कायम माझे निर्णय हे ह्रदयातून आणि क्लबचे हित पाहूनच घेतले आहे. सध्याच्या परिस्थिती पाहता मी क्लब विकण्याचा निर्णय घेतला आहे. मला असे वाटते की ही क्लबच्या, चाहत्यांच्या आणि कामगारांच्या दृष्टीने हिताची गोष्ट आहे.'

अ‍ॅब्रामोव्हिच त्यांच्या 200 कोटी डॉलर्स कर्जाबाबत बोलताना म्हणाले की, ते 19 वर्षात क्लबमध्ये ओतलेला पैसा परत मागणार नाहीत. चेल्सीने काही महिन्यापूर्वीच दुबईत झालेल्या क्लब वर्ल्डकप स्पर्धा जिंकला होती. त्यावेळी अ‍ॅब्रामोव्हिच मैदानात उपस्थिती होते. गेल्या वर्षी त्यांनी चॅम्पियन्स लीगचे (Champions League) विजेतेपदही पटकावले.

अ‍ॅब्रामोव्हिच आपल्या अधिकृत वक्तव्यात पुढे म्हणतात की, 'क्लब विक्रीची (Sell Chelsea) प्रक्रिया फास्ट ट्रॅक करण्यात आलेली नाही. याबाबतीत जी काही प्रक्रिया आहे ती पार पाडली जाईल. मी कोणत्याही कर्जाची परतफेड करावी अशी मागणी केलेली नाही. माझ्यासाठई क्लब चालवणे हा काही व्यवसाय नाही. मी एक फूटबॉलची पॅशन म्हणून हा क्लब चावलत होतो. मी माझ्या टीमला निर्देश दिले आहेत की क्लब विक्री प्रक्रियेतून मिळणाऱ्या पैसे युक्रेनमधील युद्धग्रस्त (Ukraine War Victims) लोकांसाठी वापरण्यात यावे. यासाठी एक सेवाभावी संस्था स्थापन करण्यासही सांगितले आहे. यात युद्धात होरपळलेल्या नागरिकांसाठी त्वरित मदत करण्याचा प्रयत्न केला जाईल. याचबरोबर युद्धातून सावरण्यासाठी दीर्घकालीन योजनांनाही आम्ही पाठिंबा देणार आहोत.'

चेल्सीचे मालक अ‍ॅब्रामोव्हिच यांनी हा आपल्यासाठी अत्यंत कठीण निर्णय होता असे सांगितले. क्लबपासून अशा पद्धतीने दूर होणे माझ्यासाठी वेदना देणारे आहे असे ते म्हणाले. याचबरोबर त्यांनी 'स्टँमफोर्ड ब्रीजला भेट देऊन वैयक्तिकरित्या मला तुमची रजा घेण्याची संधी मला मिळेल अशी आशा करतो. चेल्सी क्लबचा एक भाग होणे हे माझ्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. चेल्सी क्लब आणि त्यांचे समर्थक हे कायम माझ्या ह्रदयात राहतील.' असे म्हणत आपले वक्तव्य संपवले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Bomb Threat: "दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोट होणार," पोलीस नियंत्रण कक्षाला आलेल्या फोनमुळे खळबळ

Swati Maliwal: '...तर सिसोदिया आज इथं असते...', आपच्या मोर्चाच्या निर्णयानंतर स्वाती मालीवाल यांचं ट्विट

Simple Hacks: कुलर सुरू असताना पण खोली दमट वाटते? थंडावा निर्माण करण्यासाठी वापरा 'या' ट्रिक्स

Mumbai local: मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

Singham Again: श्रीनगरमध्ये सुरुये 'सिंघम अगेन'चं शूटिंग; अजय देवगण आणि जॅकी श्रॉफ यांच्या अॅक्शन सीनचा व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT