IPL 2023 Ruturaj Gaikwad Half Century Esakal
क्रीडा

Ruturaj Gaikwad : दोन षटकात चोपल्या 24 धावा ! संधी नाकारणाऱ्या पांड्याला ऋतुराजने दिले चोख प्रत्युत्तर

अनिरुद्ध संकपाळ

IPL 2023 Ruturaj Gaikwad Half Century : गुजरात जायंट्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने भारतीय टी 20 संघाच्या नेतृत्वाची धुरा आपल्या खांद्यावर घेतल्यापासून संघ निवडीत त्याचीच चलती असल्याचे दिसून येते. हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुभमन गिलला टी 20 संघात आपली जागा मिळवण्यासाठी चांगली संधी दिली. मात्र या प्रयत्नात महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडला भारतीय संघातील स्थान डळमळीत झाले होते.

मात्र ऋतुराज गायकवाडने आयपीएल 2023 च्या पहिल्याच सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्याला आपला दम दाखवून दिला. गुजरात विरूद्ध चेन्नई विरूद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या हार्दिक पांड्याला सीएसकेचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने चांगलेच दमवले. त्याने पॉवर प्लेमध्ये दमदार फलंदाजी करत सीएसकेचा धावफलक चांगलाच हलता ठेवला.

दुसऱ्या बाजूने सीएसकेचे फलंदाज चांगली सुरूवात करून बाद होत असताना ऋतुराज मात्र खेळपट्टीवर स्थिरावला. त्याने सीएसकेचे 11 व्या षटकात शतक धावफलकावर लावले. यात त्याच्या 70 धावांचा मोठा वाटा होता. विशेष म्हणजे ऋतुराजने गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याला त्याच्या पहिल्या दोन षटकात चांगलेच चोपले.

ऋतुराजने हंगामातील पहिला चौकार आणि पहिला षटकार हा हार्दिकच्या गोलंदाजीवरच मारला. यामुळे हार्दिकची बॉलिंग फिगर ही 2 षटक 24 धावा अशी झाली. पांड्याने 12 च्या सरासरीने धावा दिल्या.

मात्र सीएसकेकडून एकाकी झुंज देणाऱ्या ऋतुराज पहिल्याच सामन्यात शतक ठोकण्यापासून वंचित राहिला. त्याला अल्झारी जोसेफने 92 धावांवर (50 चेंडूत) बाद केले. यानंतर चेन्नईची धावगती मंदावली अन् त्यांना 20 षटकात 179 धावांपर्यंतच मजल मारता आली.

(Sports Latest News)

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT