Ruturaj Gaikwad Says We Lose Because Of Dew Factor esakal
क्रीडा

Ruturaj Gaikwad : दवाने केला घात! ऋतुराजने केली गोलंदाजांची पाठराखण

सकाळ वृत्तसेवा

Ruturaj Gaikwad Says We Lose Because Of Dew Factor

गुवहाटी, ता. २९ (पीटीआय) : फारच अधिक प्रमाणात दव पडल्याचा परिणाम आपल्या गोलंदाजीवर झाला त्यामुळे २२२ या धावसंखेचे संरक्षण करता आले नाही, अशी कारणमिमांसा भारतीय उपकर्णधार ऋतुराज गायकवाड याने केली.

मंगळवारी झालेल्या तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात ऋतुराज गायकवाडच्या शानदार नाबाद शतकाच्या जोरावर भारताने २२२ धावा उभारल्या होत्या, परंतु ऑस्ट्रेलियाने हे आव्हान एक चेंडू राखून पार केले. यात मॅक्सवेलने ४७ चेंडूत नाबाद शतकी खेळी केली. भारतीय गोलंदाजांनी अखेरच्या पाच षटकांत तब्बल ८० धावां दिल्या. यात अंतिम षटकांत मॅक्सवेलने प्रसिद्ध कृष्णाविरुद्ध २३ धावा फटकावल्या.

विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघात स्थान अलेल्या प्रसिद्ध कृष्णाने चार षटकांत तब्बल ६८ धावा दिल्या. टी-२० प्रकारात चार षटकांत सर्वाधिक धावा देणारा तो भारतीय गोलंदाज ठरला.

भारतीय गोलंदाजी खराब झाली असे मी म्हणणार नाही, मैदानावर एवढ्या प्रमाणात दव पडले होते त्यामुळे ओला झालेला चेंडू टाकावा लागत होता. आणि अशा चेंडूवर नियंत्रण ठेवणे फारच कठीण असते, असे ऋतुराजने सामना संपल्यानंतर सांगितले.

दव असलेल्या अशा स्थितीत एका षटकांत १२, १३ किंवा १४ धावा सहजपणे फटकावल्या जात असतात. मालिकेतील पहिल्या सामन्यात आम्हाला २१० धावांचे आव्हान पार करताना अडचणी आल्या नव्हत्या, असे ऋतुराज म्हणाला.

आपला १०० वा टी-२० सामना खेळत असलेल्या मॅक्सवेलने ४८ चेंडूत नाबाद १०४ धावांची खेळी केली. मॅक्सवेल आणि मॅथ्यू वेड यांनी अखेरच्या दोन षटकांत ४५ धावांची लयलूट केली. अखेरच्या सात षटकांत ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १०० धावांची गरज होती अशा स्थितीत सामना जिंकून देताना मॅक्सवेलने केलेली खेळी अफलातून होती, असे ऋतुराज (Ruturaj Gaikwad) म्हणाला.

भारतीय गोलंदाजीची पाठराखण करताना मॅक्सवेलने सांगितले, आमच्या गोलंदाजांनी जेवढा शक्य होईल तेवढा नियंत्रित मारा करण्याचा प्रयत्न केला, परंतु ओला झालेला चेंडू हातातून निसटत होता, अशी परिस्थीती गोलंदाजांसाठी फारच आव्हानात्मक असते. आम्ही २३० धावा केल्या असत्या तरीही त्या पुरेशा ठरल्या नसत्या.

ऋतुराजने ट्वेन्टी-२० प्रकारातील आपले पहिले वहिले शतक केले, परंतु त्याची खेळी संमिश्र होती. पहिल्या ५० धावा त्याने ३२ चेंडूत पूर्ण केल्या आणि शतक अवघ्या ५२ चेंडूत झळकावले.

मलिकेतील चौथा सामना रायपूरमध्ये शुक्रवारी होणार आहे. अखेरच्या दोन सामन्यांत श्रेयस अय्यर संघात परतणार आहे.

मैदानावर पडलेले दव आणि मॅक्सवेलचा झंझावात सुरु असताना काहीच करता येत नसते.

-ऋतुराज गायकवाड

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कृषी खातं म्हणजे त्रास? क्रीडा खात्याचं बरं होतं, लय त्रास नव्हता, मंत्री भरणेंचं विधान; स्पष्टीकरणही दिलं

Asia Cup 2025 साठी पाकिस्तान संघाची घोषणा! बाबर आझम, रिझवानला डच्चू; पाहा कोण झालं कर्णधार

Asim Munir : 'अल्लाहनं मला रक्षक म्हणून पाठवलंय...'; ऑपरेशन सिंदूरमध्ये पराभूत झाल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानचे लष्करप्रमुख?

Success Story: ऊसतोड कामगाराची लेक ठरली मुंबई पोलिसांत; गावकऱ्यांचा अभिमान वाढला

Bihar Elections 2025 : बिहारमध्ये गुंतवणूकदारांसाठी पायघड्या; नीतिशकुमार यांची आर्थिक विशेष पॅकेजची घोषणा

SCROLL FOR NEXT