Sa vs Ind 2nd Test 
क्रीडा

Sa vs Ind 2nd Test : KL राहूलच्या एका चूकीमुळे रडकुंडीला आली टीम इंडिया? मार्करमनं ठोकलं शामदार शतक

Kiran Mahanavar

South Africa vs India 2nd Test : केपटाऊनच्या खेळपट्टीवर मोहम्मद सिराजनंतर जसप्रीत बुमराहच्या तालावर दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज नाचले. या उजव्या हाताच्या फलंदाजाने दुस-या कसोटीच्या पहिल्या सत्रात धुमाकूळ घातला आणि सहा बळींचा टप्पा पूर्ण केला. पण केपटाऊनच्या या खेळपट्टी ज्यावर संघांना 100 धावा करणे कठीण होते, ज्यावर मार्करामने दुसऱ्या डावात शानदार शतक झळकावले.

केपटाऊन कसोटी सामन्यात विकेट्सची पडझड झाली होती, पण या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर एडन मार्करामची शानदार फलंदाजी पाहायला मिळाली, ज्याने आपल्या संघासाठी अत्यंत महत्त्वाची खेळी खेळली.

एडन मार्कराम 73 च्या वैयक्तिक स्कोअर होता. त्यावेळी भारतीय यष्टिरक्षक केएल राहुलने मार्करामचा सोपा झेल सोडला. आणि हाच ड्रॉप कॅच भारतासाठी महागात पडला, त्यांच्यापुढे मार्कराम वेगाने धावा करत आपले शतक पूर्ण करण्यात यशस्वी झाला.

या डावात मार्करामने 103 चेंडूत 2 षटकार आणि 17 चौकारांच्या मदतीने 106 धावांची खेळी केली. हे त्याचे भारताविरुद्धचे कसोटी क्रिकेटमधील पहिले शतक होते. तर ते त्याच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीतील हे सातवे शतक आहे. त्याला मोहम्मद सिराजने झेलबाद केले.

एडन मार्करामच्या खेळीमुळे 78 धावांची आघाडी मिळाली. दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या डावात 173 धावांत गारद झाला. भारताला विजयासाठी 79 धावांची गरज आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 55 धावा केल्या होत्या. त्यानंतर भारत 153 धावांवर ऑलआऊट झाला होता.

दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वात वेगवान कसोटी शतक

  • 75 चेंडू – एबी डिव्हिलियर्स विरुद्ध भारत, सेंच्युरियन, 2010

  • 87 चेंडू – हाशिम आमला विरुद्ध ऑस्ट्रेलिया, पर्थ, 2012

  • 95 चेंडू - डेनिस लिंडसे विरुद्ध ऑस्ट्रेलिया, जोहान्सबर्ग, 1966

  • 95 चेंडू – जॉन्टी रोड्स विरुद्ध वेस्ट इंडीज, सेंच्युरियन, 1999

  • 95 चेंडू - शॉन पोलॉक विरुद्ध श्रीलंका, सेंच्युरियन, 2001

  • 99 चेंडू – एडन मार्कराम विरुद्ध भारत, केपटाऊन, 2024

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

India Cricket Matches in 2026: टी२० वर्ल्ड कप ते इंग्लंड, न्यूझीलंडचे दौरे... भारतीय संघाचे २०२६ वर्षात कसे आहे संपूर्ण वेळापत्रक?

SCROLL FOR NEXT