Pujara And Rahane
Pujara And Rahane  Sakal
क्रीडा

हीच ती वेळ! पुजाराला संधी द्या, पण अजिंक्यला बाहेर बसवा : गंभीर

सुशांत जाधव

दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणेनं (Ajinkya Rahane) अर्धशतक झळकावले. त्याने 78 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकार खेचत 58 धावांचे योगदान दिले. तरीही भारतीय माजी क्रिकेटर गौतम गंभीर (Gautam Gambhir) अजिंक्यच्या कामगिरीवर खुश नाही. अजिंक्य रहाणेला बाकावर बसवण्याची वेळ आली आहे, असे गंभीरने म्हटले आहे. यावेळी त्याने पुजाराची मात्र पाठराखण केलीये. पुजाराला आणखी एक संधी मिळायला हवी, असे रोखठोक मत गंभीरने मांडले आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील दुसरा कसोटी सामना जोहन्सबर्गच्या मैदानात सुरु आहे. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर 240 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. रहाणेनं दुसऱ्या डावात 58 धावांची खेळी केली. टीम इंडियाकडून एखाद्या खेळाडूने केलेली ही सर्वोच्च खेळी आहे. विराट कोहली (Virat Kohli) दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीला मुकलाय. पण जर तो तिसऱ्या कसोटीत खेळला तर बसवायचे कुणाला हा मोठा प्रश्न भारतीय संघासमोर आहे.

गौतम गंभीरने स्टार स्पोर्ट्सवरील कार्यक्रमादरम्यान तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटीत कोणाला स्थान मिळायला पाहिजे, याबद्दल मत मांडले. तो म्हणाला की, ‘हनुमा विहारीने दोन्ही डावात चांगली कामगिरी करुन दाखवली आहे. अजिंक्य रहाणेनं भलेही अर्धशतकी खेळी केली असली तरी त्याला अधिक संधी मिळाली आहे. हनुमा विहारी (Hanuma Vihari) केवळ कसोटीतच खेळतो. ऑस्ट्रेलियातही त्याने चांगली कामगिरी केली होती. जर तुम्हाला भविष्याबद्दल विचार करायचा असेल तर त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान द्यावे लागेल.

हनुमा विहारीनं (Hanuma Vihari) दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात 40 धावांची नाबाद खेळी केली. टीम इंडियाने 228 धावांवर 8 विकेट गमावल्या होत्या. विहारीच्या खेळीमुळे टीम इंडियाला 266 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे पुढच्या सामन्यात त्याचा विचार व्हायलाच पाहिजे, असे स्पष्ट मत गंभीरने मांडले.

...म्हणून पुजाराला संधी मिळायलाच हवी

गौतम गंभीर पुढे म्हणाला की, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणं ही एक स्पेशलिटी आहे. त्यामुळे पुजाराला या क्रमांकावर खेळवणेच योग्य आहे. त्यामुळे पुढील सामन्यात त्याला संधी द्यावी. पुजारा मागील 2 वर्षांपासून शतक करण्यात अपयशी ठरलाय. पण दुसऱ्या डावात 53 धावा करुन त्याने आपल्या भात्यातील जादू कायम असल्याचे दाखवून दिले. त्याने रहाणेसोबत शतकी भागीदारी केली होती. उल्लेखनिय आहे की, भारतीय संघाकडे सध्याच्या घडीला श्रेयस अय्यरच्या रुपात आणखी एक पर्याय आहे. तो अद्याप आफ्रिकेत एकही सामना खेळलेला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानवतेला धक्का देणारी घटना! पतीसोबत भांडण झाल्यावर आईने 6 वर्षाच्या मुलाला केलं मगरीच्या हवाली

Latest Marathi News Update : पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्या पत्राचा विचार केल्याने राजीनामा मागे घेत आहे- नसीम खान

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

Car Care Tips : ‘या’ चुकांमुळे कमी होऊ शकते इलेक्ट्रिक कारची रेंज, अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT