SA vs IND, Record  Twitter
क्रीडा

Record : KL राहुल-मयांकची कमाल; सेंच्युरियनवर वर्ल्ड रेकॉर्ड

सुशांत जाधव

South Africa vs India, 1st Test Day 1: सेंच्युरियनच्या मैदानात रंगलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस राहुल-मयांकनं गाजवला. भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करणाऱ्या केएल राहुल (KL Rahul) आणि मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) जोडीनं क्रिकेटच्या मैदानात नवा इतिहास रचला आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. या जोडीनं आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत संघाला दमदार सुरुवात करुन दिली.

पहिल्या विकेटसाठी दोघांनी 117 धावांची भागीदारी केली. अर्धशतकी भागीदारी पूर्ण करताच एक खास रेकॉर्ड या जोडीच्या नावे झाला. केएल राहुल आणि मयंक सेंच्युरियनच्या मैदानात अर्धशतकी भागीदारी करणारी दुसरी सलामी जोडी ठरलीये. घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्यांदा गोलंदाजी करताना अशी कामगिरी करण्याचा पराक्रम त्यांनी करुन दाखवला.

यापूर्वी 2007 मध्ये वेस्टइंडीजच्या क्रिस गेल आणि डॅरेन गंगा या सलामी जोडीनं पहिल्या विकेटसाठी 98 धावांची भागीदारी रचली होती. यांच्या पुढे जाऊन त्यांनी पहिल्या विकेटसाठी 117 धावा जोडल्या. याशिवाय भारताकडून खेळताना कर्नाटकच्या दोन खेळाडूंनी शतकी भागीदारी करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या मैदानात भारताकडून शतकी भागीदारीचाही खास विक्रम झाला. यापूर्वी गौतम गंभीर आणि विरेंद्र सेहवाग या जोडीने 2010-11 च्या दौऱ्यात सेंच्युरियनच्या मैदानात 137 धावांची भागीदारी रचली होती. 2006/07 च्या दौऱ्यात वसीम जाफर आणि दिनेश कार्तिकनं डावाची सुरुवात करताना सर्वाधिक 153 धावांची सलामी दिली होती. दक्षिण आफ्रिकेतील 21 कसोटी सामन्यात भारतीय सलामीवीरांनी केलेली ही तिसरी 100+ भागीदारी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: राजस्थान रॉयल्सने स्वतःसाठी खड्डा खणला... गुजरात टायटन्समुळे Point Table फिरला; PBKS, RCB ला धक्का

Donald Trump: व्हाईट हाउसमध्ये वैदिक मंत्रोच्चारण; बीएपीएस स्वयंसेवकांनी वैश्विक शांततेसाठी केली प्रार्थना

RR vs GT Live : छोटी हाईट, वातावरण टाईट! वैभव सूर्यवंशीने मोडला विराट, सूर्या, श्रेयस अन् ख्रिस गेलचा विक्रम; बनतोय नवा 'हिटमॅन'

SSC Exam Result : निरक्षर आई-वडिलांच्या मुलाने दहावीत मिळविले ९४ टक्के गुण

RR vs GT Live : आशिष नेहराने खुणावलं... मोहम्मद सिराजने अगदी तसं केलं... वर्ल्ड रेकॉर्ड करणारा वैभव सूर्यवंशी असा फसला Video

SCROLL FOR NEXT