Jasprit Bumrah  Themba Hadebe
क्रीडा

SA vs IND : फ्रंटफूटवर असलेल्या टीम इंडियाला धक्का; बुमराह जायबंदी

सुशांत जाधव

South Africa vs India, 1st Test : दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ फ्रंटफूटवर आहे. तिसऱ्या दिवशीच्या खेळात भारतीय फलंदाजी अपयशी ठरली. भारतीय गोलंदाजांनी चेंडू हातात येताच ही उणीव भरुन काढली. जसप्रित बुमराहनं (Jasprit Bumrah) पहिल्याच षटकात दक्षिण आफ्रिकेला दणका दिला. काही अंतराने विकेट पडत राहिल्या. अवघ्या 32 धावांत दक्षिण आफ्रिकेनं आघाडीचे चार फलंदाज तंबूत परतले आहेत.

घरच्या मैदानावर खेळत असताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाला बॅकफूटवर ढकलून फ्रंटफूटवर खेळत असलेल्या टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जायबंद झाला आहे. घोट्याला झालेल्या दुखापतीमुळे तो मैदानात वेदनेनं व्याकूळ झाल्याचे पाहायला मिळाले. मेडीकल टीम मैदानात आली. एवढेच नाहीतर वैयक्तिक सहाव्या षटकातील शेवटचा चेंडू न टाकताच त्याला तंबूत जावे लागले आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या डावातील 11 व्या षटकात जसप्रित बुमराह गोलंदाजी करत होता. फॉलो-थ्रू दरम्यान त्याच्या घोट्याला दुखापत झाली. दुखापतीनंतर त्याला प्रचंड वेदना होत असल्याचे दिसून येत होते. भारतीय संघाचे फिजिओ नितीन पटेल मैदानात आले. या दुखापतीमुळे बुमराहला ड्रेसिंगरुममध्ये जाण्याची वेळ आली. बीसीसीआयने देखील यासंदर्भातील माहिती दिलीये. बुमराहच्या उजव्या घोट्याला दुखापत झाली असून तो मेडिकल टीमच्या निरीक्षणाखाली आहे, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. त्याच्या जागी श्रेयस अय्यर फिल्डिंगसाठी मैदानात उतरला आहे.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाने पहिल्या दिवसाच्या खेळात 3 बाद 272 धावा केल्या होत्या. भारतीय संघ पहिल्या डावात 400 पेक्षा अधिक धावा करतील अशी अपेक्षा होती. पण दुसरा दिवस पावसाने बॅटिंग केल्यानंतर खेळपट्टीनं रंग बदलला. भारतीय संघाचा पहिला डाव 327 धावांतच आटोपला. अखेरचे सात फलंदाज अवघ्या 55 धावांत तंबूत परतले. दक्षिण आफ्रिकेनं आपल्या पहिल्या डावाला सुरुवात केल्यानंतर आघाडीचे चार फलंदाज स्वस्तात माघारी परतले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: सुरतमध्ये अपहरण, मुंबईत संपवलं; पण कुणी? कुशीनगर एक्सप्रेसच्या शौचालयात सापडलेल्या ५ वर्षीय मुलाच्या मृतदेहाचं कोडं उलगडलं

'Vaibhav Suryavanshi ला फार सल्ले द्यायला जाऊ नका...', रायुडू असं का म्हणाला? वाचा

Latest Marathi News Updates: पुण्यात घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

Asia Cup 2025: श्रेयस अय्यरला डावलून शुभमन गिलला संधी; मांजरेकर बसरले, 'हा अन्याय आहे...'

Palghar News: भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT