Rishabh Pant Sakal
क्रीडा

VIDEO : पंतचा तडाखा! बॅट एका बाजूला अन् बॉल दुसऱ्या बाजूला

सुशांत जाधव

भारतीय संघाचा अष्टपैलू विकेट किपर बॅटर रिषभ पंतने (Rishabh Pant) एकहाती किल्ला लढवला. त्याच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने (Team India) दक्षिण आफ्रिकेसमोर (South Africa) 212 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. धावफलकावर 58 धावा असताना अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) रुपात टीम इंडियाला चौथा आणि मोठा धक्का बसला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि पंतने संघाला आकार दिला. विराट फक्त थांबला होता आणि पंत आफ्रिकन गोलंदाजांची शाळा घेत होता. कोहली पंतने पाचव्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी केली.

कोहलीनं 143 चेंडूत 29 धावा करुन बाद झाला. त्यानंतर पंतने दुसरी बाजू लावून धरली. तो शेवटपर्यंत खेळला. एकाबाजूनं विकेट पडत असल्यामुळे त्याचे शतक होईल की नाही, अशी शंकाही होती. पण शतक होईपर्यंत एका बाजूनं त्याला साथ मिळाली. भारताच्या दुसऱ्या डावात शतकापूर्वी त्याने खेळलेला फटका आणि त्यानंतर घडलेला प्रकार थक्क करुन सोडणारा होता. 60 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर त्याने कडक फटका मारला खरा. पण यावेळी त्याच्या हातून बॅट सुटली. बॉल डिप कव्हरच्या दिशेनं आणि बॅट स्वेअर लेगच्या दिशेनं गेल्याचे पाहायला मिळाले. या चेंडूवर पंतला एकही धाव मिळाली नाही. याआधीही पंतच्या बाबतीत असा प्रकार घडल्याचे पाहायला मिळाले आहे.

भारतीय संघाने पहिल्या डावात 223 धावा केल्या होत्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा डाव 210 धावांत आटोपून टीम इंडियाने 13 धावांची अल्प आघाडी घेतली. दुसऱ्या डावात भारतीय संघाची सुरुवात पहिल्या डावापेक्षाही खराब झाली. पंतनं केलेले नाबाद शतक आणि विराट कोहलीच्या 29 धावा आणि लोकेश राहुलच्या 10 धावा याव्यतिरिक्त एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. परिणामी भारताचा दुसरा डाव 198 धावांत आटोपला. भारतीय गोलंदाजांनी पहिल्या डावाप्रमाणे कसून मारा केला तर सामना भारताच्या बाजूनं फिरुही शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT