Sachin Tendulkar Virat Kohli Wimbledon
Sachin Tendulkar Virat Kohli Wimbledon  Wimbledon Facebook
क्रीडा

विम्बल्डन सुरु असताना रंगली सचिन-विराट जोडीची चर्चा

सुशांत जाधव

टेनिस जगतातील लोकप्रिय ग्रँडस्लॅमपैकी एक असलेल्या विम्बल्डन स्पर्धेला सुरुवात झालीये. विम्बल्डनच्या यंदाच्या हंगामात 50 टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात आलाय. टेनिस जगतातील बहुचर्चित स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर क्रिकेटच्या मैदानातील विक्रमादित्य सचिन तेंडुलकर आणि सध्याच्या घडीला रन मशिन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहलीची चर्चा सुरु आहे. आता तुम्ही म्हणालं टेनिस स्पर्धा सुरु असताना क्रिकेटमधील ही मंडळी चर्चेत का आली? याच्या मागेही खास कारण आहे. (Sachin Tendulkar And Virat Kohli With Wife Wimbledon Share Memorable Movement Roger Federer Match Wach Video)

खुद्द आयोजकांनीच या दोन क्रिकेटर्सच्या आठवणींना उजाळा दिलाय. विम्बल्डनने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर केलाय. यात सचिन तेंडुलकर त्याची पत्नी अंजली तेंडुलकर, भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहली, त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा विम्बल्डनच्या सामन्याचा आनंद घेताना पाहायला मिळते.

कधीचा आहे हा व्हिडिओ

सचिन तेंडुलकर याचे टेनिस प्रेम जगजाहीर आहे. अनेकदा तो टेनिसचा आनंद घेताना आणि खुद्द टेनिस खेळतानाही दिसला आहे. 2015 मध्ये सचिन तेंडुलकर, अंजली तेंडुलकर, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी सहा वर्षांपूर्वी रॉजर फेडरर आणि अँडी मरे यांच्यात रंगलेल्या सेमीफायनलचा सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर हजेरी लावली होती. या सामन्यात फेडररने बाजी मारली होती. सचिन आणि विराट दोघेही फेडररचे चाहते आहेत.

फेडररची अखेरची स्पर्धा

गेल्या काही दिवसांपासून फेडरर दुखापतीमुळे सातत्याने कोर्टपासून दूर दिसतोय. यंदाच्या स्पर्धेत तो कशी कामगिरी करतोय याकडे त्याच्या चाहत्यांच्या नजरा लागून आहेत. यंदाची विम्बल्डन फेडररसाठी शेवटची असू शकते, असा अंदाजही वर्तवण्यात येत आहे. 20 वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारा फेडररही या स्पर्धेवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. विम्बल्डनमध्ये स्वत:ला झोकून देऊन खेळवण्यासाठी त्याने फ्रेंच ओपनच्या तिसऱ्या राउंडमधूनच माघार घेतली होती.

जागतिक टेनिस क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या सर्बियाचा नोवाक जोकिविच गत चॅम्पियन आहे. त्याने ऑस्ट्रेलियन ओपन आणि फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली असून फेडरर आणि त्याच्यामध्ये आमना सामना होऊ शकतो.

पुरुष गटात सर्वाधिकवेळा विम्बल्डन स्पर्धा जिंकण्याचा विक्रम हा रॉजर फेडररच्या नावे आहे. त्याने 8 वेळी ही स्पर्धा जिंकली आहे. विलियम रेनशॉ, पीट सेम्प्रास यांनी प्रत्येकी 7-7 वेळा स्पर्धा जिंकली आहेत. महिला गटात अमेरिकन मार्टिना नवरातिलोवाच्या नावे 9 वेळा स्पर्धा जिंकण्याचा विक्रम आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

IPL 2024, KKR vs DC Live Score: ऋषभ पंतने जिंकला टॉस! पृथ्वी शॉ-स्टार्कचं पुनरागमन, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT