sachin tendulkar brian lara names given to sydney cricket ground gates at australia  
क्रीडा

Sachin Tendulkar : सचिन.. सचिन… ऑस्ट्रेलियातील सिडनी क्रिकेट ग्राउंडवर घुमत राहणार नाव; कारण…

रोहित कणसे

महान भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त सोमवारी प्रसिद्ध सिडनी क्रिकेट मैदानावर (SCG) त्याच्या नावाच्या गेटचे अनावरण करण्यात आले. सचिन सोमवारी 50 वर्षांचा झाला. सचिनने SCG वर पाच कसोटी सामन्यांमध्ये 157 च्या सरासरीने 785 धावा केल्या आहेत, ज्यात नाबाद 241 च्या सर्वोच्च धावसंख्या आहे. तेंडुलकरने SCG हे भारताबाहेर त्याचे आवडते क्रिकेट मैदान असल्याचे देखील म्हटले आहे.

तेंडुलकरने SCG च्या माध्यमातून जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिडनी क्रिकेट ग्राउंड हे भारताबाहेर माझे आवडते मैदान आहे. 1991-92 मधील माझ्या पहिल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून माझ्या काही खास आठवणी SCGशी जोडलेल्या आहेत.

दरम्यान SCG वर ब्रायन लाराच्या 277 धावांच्या खेळीला 30 वर्षे पूर्ण केल्याबद्दल, वेस्ट इंडिजच्या दिग्गज फलंदाजाच्या नावावर असलेल्या गेटचे अनावरणही करण्यात आले. दोन गेट्सचे अनावरण SCG चे अध्यक्ष रॉड मॅकगिओच आणि CEO केरी माथेर आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे CEO निक हॉकले यांच्या हस्ते करण्यात आले.

या मुळे आता खेळाडू आता लारा-तेंडुलकर गेटमधून मैदानात प्रवेश करतील. या दोन्ही गेट्सवर या दोन्ही खेळाडूंच्या कामगिरीचे आणि SCG मधील त्यांच्या रेकॉर्डचे वर्णन करणारा फलकही लावण्यात आला आहे. तेंडुलकर म्हणाला, एससीजीमध्ये प्रवेश करण्यासाठी खेळाडू माझ्या आणि माझा चांगला मित्र ब्रायन यांच्या नावावर असलेल्या गेटचा वापर करतील हा मोठा सन्मान आहे. याबद्दल मी SCG आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे आभार मानतो. लवकरच SCG ला भेट देणार आहे.

यावरन लारा म्हणाला की, सिडनी क्रिकेट ग्राऊंडवरून मिळालेल्या या मान्यतेमुळे मला खूप सन्मानाची भावना वाटतो आणि मला खात्री आहे की सचिनलाही असेच वाटत असेल. माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या या मैदानाशी खूप खास आठवणी जोडलेल्या आहेत आणि मी जेव्हाही ऑस्ट्रेलियात असतो तेव्हा या मैदानाला भेट दिल्याने नेहमीच मला आनंद होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Everything About Hormones: हार्मोन बिघाड म्हणजे काय? कारणं, लक्षणं आणि उपचार यांची संपूर्ण माहिती

Satara Crime: संतापजनक घटना! 'शिवथरमध्ये विवाहितेचा गळा चिरून निर्घृण खून'; घरात काेणीच नसल्याची संधी साधली अन्..

Panchang 8 July 2025: आजच्या दिवशी गणपतीला बुंदीच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा

आजचे राशिभविष्य - 8 जुलै 2025

kolhapur News : पावसाचा फटका! 'पन्हाळा तालुक्यातील ३३४० शेतकरी सापडले आर्थिक संकटात'; अद्याप शासनाकडून भरपाई नाही..

SCROLL FOR NEXT