Sachin Tendulkar WTC Final  esakal
क्रीडा

Sachin Tendulkar WTC Final : तो निर्णय का घेतला समजलं नाही... तेंडुलकरने रोहित - राहुलच्या निर्णयावर केली टीका

अनिरुद्ध संकपाळ

Sachin Tendulkar WTC Final : ऑस्ट्रेलियाने भारताचा 209 धावांनी पराभव करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली. भारताने सलग दुसऱ्यांदा WTC Final मध्ये प्रवेश केला होता. मात्र सलग दुसऱ्यांदा भारताला विजेतेपदाने हुलकावणी दिली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 496 तर दुसऱ्या डावात 270 धावा केल्या. भारताला पहिल्या डावात 296 धावाच करता आल्या. त्यामुळे चौथ्या डावात भारतासमोर 444 धावांचे मोठे आव्हान उभे राहिला. भारताचा संपूर्ण संघ 234 धावात गुंडाळात ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला. (Sachin Tendulkar Criticize Rohit Sharma Rahul David For Dropping Ravichandran Ashwin)

भारताच्या पराभवानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ट्विट करत ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन केले तर रोहित आणि राहुल द्रविडने फायनलासाठी केलेल्या संघनिवडीवर निशाना साधला. सचिन तेंडुलकर आपल्या ट्विटमध्ये म्हणतो की, 'WTC Final जिंकल्याबद्दल ऑस्ट्रेलियन संघाचे अभिनंदन. स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅविस हेड यांनी पहिल्या दिवशीच मजबूत पायाभरणी केली. त्यांनी सामना त्यांच्या बाजूने झुकवला. भारताला पहिल्या डावात मोठी धावसंख्या भारणे गरजेचे होते. मात्र त्यांना ते करता आले नाही.'

सचिन पुढे म्हणाला की, 'भारतासाठी सामन्यात काही चांगले क्षण आले. मात्र मला आयसीसी कसोटी रँकिंगमधील अव्वल स्थानावर असलेल्या अश्विनला प्लेईंग 11 मधून वगळण्याचा निर्णय काही समजलाच नाही. मी आधी सांगितल्याप्रमाणे गुणवान फिरकी गोलंदाज हा फक्त फिरकीला पोषक असलेल्या खेळपट्टीवरच अवलंबून असतो असे नाही. तो ड्रिफ्ट आणि बाऊन्सचा, वैविध्यपूर्ण गोलंदाजीचा वापर तो करू शकतो. ऑस्ट्रेलियाच्या टॉप 8 फलंदाजातील 5 फलंदाज हे डावखुरे होते हे तुम्ही विसरू शतक नाही.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात घसरण; आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय आहे 24 कॅरेट सोन्याचा भाव?

Kolhapur Crime: 'कुरुंदवाडात धारदार शस्त्राने युवकावर सपासप वार'; एकमेकाकडे खुन्नसपणे बघण्याच्या रागातून झाला वाद

Trimbakeshwar : पहिने धबधब्याला पर्यटकांची गर्दी; नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर तुफान कोंडी

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nagpur Crime : निर्माल्य विसर्जनानंतर पतीसोबत काढला 'सेल्फी' अन् महिलेने नदीत मारली उडी; दोघांत असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT