Who is Better Batsmen Virat Kohli or Sachin Tendulkar
Who is Better Batsmen Virat Kohli or Sachin Tendulkar esakal
क्रीडा

सचिन भारी की विराट? उत्तर खुद्द देवानंच दिलं

अनिरुद्ध संकपाळ

विराट कोहली (Virat Kohli) जरी गेल्या काही वर्षापासून शतकांच्या दुष्काळातून जात असला तरी तरी तो सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) 100 शतकांचा विश्वविक्रम मोडण्याच्या जवळ पोहचला आहे. त्याने आतापर्यंत 70 शतके ठोकली आहेत. जरी विराटला हा विक्रम मोडण्यासाठी अजून 30 शतके ठोकण्याची गरज असली तरी. जेव्हापासून सचिन तेंडुलकर निवृत्त झाला आहे तेव्हापासून सचिनचा उत्तराधिकारी म्हणून विराट कोहलीकडेच पाहिले जाते. (Who is Better Batsmen Virat Kohli or Sachin Tendulkar)

दरम्यान, विराट कोहली ज्यावेळी शतकांचा रतीब घालत होता. काही चाहते विराट कोहलीला सचिन तेंडुलकरपेक्षाही भारी फलंदाज मानतात. सचिन तेंडुलकर ज्यावेळी खेळत होता त्यावेळी सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) भारी की सचिन तेंडुलकर अशी तुलना व्हायची. आता हीच तुलना विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांच्यात होत आहे. दरम्यान, अमेरिकी पत्रकार ग्रॅहम बेंसिंगर यांनी हा प्रश्न चाहते ज्याला क्रिकेटचा देव म्हणतात त्या सचिन तेंडुलकरलाच विचारला.

यावर सचिन तेंडुलकरने जबरदस्त उत्तर दिलं. सचिन म्हणाला की, 'आम्ही दोघंही एकाच संघात आहोत हे उत्तर कसं आहे?' विराट सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. असे असले तरी त्याने वेस्ट इंडीज विरूद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात सचिन तेंडुलकर आणि एमएस धोनी यांच्या पंक्तीत जाऊन बसला. भारताने वेस्ट इंडीजविरूद्धची वनडे मालिका 3-0 अशी जिंकली आहे. आता तीन टी 20 सामन्यांची मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ''...त्या बैठकीला मी हजर होतो, मनमोहन सिंहांना मी विरोध केला होता'', मोदी नेमकं काय म्हणाले?

Rishabh Pant Vs Sanju Samson : टी 20 वर्ल्डकपसाठी ऋषभ पंत की संजू सॅमसन कोण आहे टीम इंडियाची पहिली पसंती?

'बजरंगी भाईजान' मधील मुन्नीने केली ट्रोलर्सची बोलती बंद ; दहावीला मिळाले इतके गुण

Modi Rally in Kalyan: पहिल्या 100 दिवसांच्या व्हिजनमध्ये 25 दिवस वाढवणार; मोदींनी केलं तरुणांना आवाहन

CAA Certificates: केंद्राकडून CAAची प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात; कोणाला मिळालं पहिलं प्रमाणपत्र? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT