Sachin Tendulkar Virat Kohli  esakal
क्रीडा

Sachin Tendulkar Virat Kohli : विराट विक्रमावर सचिनची पोस्ट, 'पहिल्यांदा भेटलो तेव्हा दिवसभर हसलो, तोच मुलगा आज...'

अनिरुद्ध संकपाळ

Sachin Tendulkar Virat Kohli : भारताची रन मशिन विराट कोहलीने वनडे क्रिकेटमधील आपले 50 वे शतक पूर्ण करताच सचिन तेंडुलकरने खास पोस्ट केली. विराट कोहलीने सचिन तेंडलुकरचे 49 वनडे शतकांचा विश्वविक्रम देखील मोडला. यानंतर सचिन तेंडलुकरने विराट कोहलीला एका जुन्या घटनेची आठवण करून देत भावनिक पोस्ट केली.

सचिन तेंडुलकर आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, 'ज्यावेळी भारतीय ड्रेसिंग रूममध्ये पहिल्यांदा मी तुला भेटलो त्यावेळी संघातील खेळाडूंनी तुझी चेष्टा केली होती. त्यांनी तुला माझ्या पाया पडायला लावलं होतं. मी त्यावेळी संपूर्ण दिवस हसत होतो.'

'मात्र लवकरच तू तुझ्या क्रिकेटबद्दलच्या पॅशन आणि स्कीलने माझ्या मानला स्पर्श केलास. मला आनंद होतोय की तो तरूण मुलगा आता 'विराट' खेळाडू झाला आहे.'

'एका भारतीयाने माझा विक्रम मोडल्यानं मी खूप आनंद आहे. हा विक्रम एका मोठ्या सामन्यात, वर्ल्डकप सेमी फायनल सामन्यात मोडला आहे. तेही माझ्या होम ग्राऊंडवर हा तर दुग्ध शर्करा योग!'

विराट कोहलीने आज वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकरचे दोन विक्रम मोडले. त्याने आपले वनडे क्रिकेटमधील 50 वे शतक ठोकण्यापूर्वी सचिनचा अजून एक विक्रम मोडला. विराट कोहलीने सचिनचा वनडे क्रिकेटमधील एका एडिशनमधील सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडला.

सचिन तेंडुलकरने 2003 च्या वर्ल्डकपमध्ये 673 धावा केल्या होत्या. विराट कोहलीने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत 711 धावा केल्या आहेत. वर्ल्डकपच्या एका एडिशनमध्ये 700 पेक्षा जास्त धावा करणारा तो इतिहासातील पहिला खेळाडू ठरला आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूरकरांना हवाई प्रवासाचा झटका; मुंबईसह अनेक शहरांची विमानसेवा दोन महिन्यांसाठी बंद, कारण काय?

IPL 2026 Final, RCB vs GT live: शुभमन गिलची विकेट अन् वाचला विराट कोहली-एबी डिव्हिलियर्सचा ऑल टाईम रेकॉर्ड...

Paithan Chowk Chaos: पाचोडमध्ये वाहतूक कोंडीचा कळस; आठवडी बाजाराच्या दिवशी पैठण चौक ठप्प, नागरिक हैराण

IPL 2026 Final, RCB vs GT live: गुजरात टायटन्सचे सलामीवीर अपयशी, वैभव सूर्यवंशीला लागली लॉटरी

SSC Marksheet Distribution: दहावीच्या विद्यार्थ्यांना सोमवारी गुणपत्रक व प्रमाणपत्र वाटप; सकाळी शाळांना, दुपारी विद्यार्थ्यांना वितरण

SCROLL FOR NEXT