Sachin Tendulkar Praise Rafael Nadal French Open esakal
क्रीडा

French Open : सचिन तेंडुलकरला नदालची 'माणुसकी' भावली

अनिरुद्ध संकपाळ

पॅरिस : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत स्पेनच्या राफेल नदालने (Rafael Nadal) सेमी फायनलमध्ये दाखवलेली माणुसकी भावली. त्याने ट्विट करून नदालची स्तुती केली आहे. राफेल नदाल शुक्रवारी झालेल्या सेमी फायनलमध्ये आपला दुखापतग्रस्त प्रतिस्पर्धी अलेक्झांडर झ्वेरेवची (Alexander Zverev) काळजी घेताना दिसला.

दरम्यान, सचिन तेंडुलकरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला. या फोटोत राफेल नदाल प्रतिस्पर्धी झ्वेरेवशी दुखापत झाल्यानंतर त्याला धीर देताना दिसत आहे. सचिनने 'नदालने जी माणुसकी आणि काळजी दाखवली तीच त्याला एक खास खेळाडू बनवते.' असे कॅप्शन दिले.

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या झ्वेरेवला फ्रेंच ओपनमधील सेमी फायनल (French Open Semi Final) सामना अर्ध्यावर सोडावा लागला. त्याच्या उजव्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे राफेल नदालला सामन्याचा विजेता घोषित करण्यात आले. -सेमी फायनमध्ये पहिला सेट टाय ब्रेकरवर गेला होता. हा सेट राफेल नदालने 7-6 (10-8) असा जिंकला होता.

त्यानंतर दुसरा सेट देखील 6-6 असा टाय ब्रेकरवर गेला होता. मात्र झ्वेरेव दुखापत झाली आणि त्याला मैदान सोडावे लागले. दोन्ही खेळाडूंनी झुंजार खेळ करत पहिल्या दोन सेटमध्येच जबरदस्त रंगत आणली होती.

मात्र दुसऱ्या सेटमध्ये बेसलाईनजवळचा एक फटका मारण्याच्या नादात झ्वेरेवचा घोटा दुखावला. त्याला असह्य अशा वेदाना होत होत्या. त्याला मैदानातून व्हील चेअरवरून बाहेर नेण्यात आले. अखेर त्याला सामन्यातून माघार घ्यावी लागली. राफेल नदालने 14 व्यांदा फ्रेंच ओपनची फायनल गाठली आहे. आता त्याचा सामना कॅस्पर रूडशी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arattai messaging app : स्वदेशी मेसेजिंग ॲप ‘Arattai’ची क्रेझ वाढली! ; आता आनंद महिंद्रांनीही केलंय डाउनलोड

Barshi Crime : बार्शीत एसटी महामंडळ बसच्या महिला वाहकास मारहाण; सहा महिलांविरुद्ध गुन्हा

Akola News : खदान पोलीस स्टेशनमधील नितीन मगर निलंबीत, डीबी स्कॉडवर पुन्हा संशयाची सावली

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख आणि श्रीकांत ठाकरे ही राम-लक्ष्मणाची जोडी, उद्धव ठाकरे; संगीतकार स्व. श्रीकांत ठाकरे म्युझिक स्टुडिओचे उद्घाटन

Latest Marathi News Live Update: वृद्ध महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावणारा सराईत चोरटा गजाआड

SCROLL FOR NEXT