Sachin Tendulkar Reading His Father Books On World Book Day esakal
क्रीडा

#WorldBookDay जेव्हा सचिन तेंडुलकर वडिलांच्या कवितांमध्ये रमतो...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : भारताचा माजी फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) सोशल मीडियावर चांगला अॅक्टिव्ह असतो. त्याने नुकतेच इन्स्टाग्रामवर (Instagram) कविता संग्रह वाचतानाचे फोटो शेअर केले आहेत. सचिन तेंडुलकर त्याचे दिवंगत वडील रमेश तेंडुलकर (Ramesh Tendulkar) यांचे 'साहित्य' हे पुस्तक वाचत होता. रमेश तेंडुलकर हे प्रसिद्ध कवी आणि कादंबरीकार होते. जागतिक पुस्तक दिनाचे (World Book Day) औचित्य साधून सचिन तेंडुलकरने आपल्या वडिलांच्या पुस्तक वाचनाची ही पोस्ट शेअर केली. सचिनने हे पुस्तक वाचन आपल्या घराच्या गार्डनमध्ये करत होता.

सचिन तेंडुलकरच्या या पोस्टवर तासाभरातच 71 हजार लाईक मिळाले होते. या पोस्टला सचिन तेंडुलकरने 'माझे बाबा रमेश तेंडुलकर यांनी लिहिलेलं साहित्य हे पुस्तक. मिस यू बाबा.' यानंतर सचिन तेंडुलकरने जागतिक पुस्तक दिनाचा हॅशटॅग वापरला होता. सचिन तेंडुलकरने आपल्या दुसऱ्या एका पोस्टमध्ये तो वडिलांचा काव्यसंग्रह वाचत असताना दिसतोय. या पोस्टला त्याने 'मी माझे वडील रमेश तेंडुलकर यांचा कवितासंग्रह वाचतोय. प्राजक्त हा रमेश तेंडुलकरांनी लिहिलेला काव्यसंग्रह आहे. काही वर्षांपूर्वी आम्ही या पुस्ताकावर म्युजिक अल्बम तयार केला होता.'

सचिन तेंडुलकरच्या या पोस्टवर एका इन्स्टाग्राम युजरने 'तुझे वडील रमेश भाई जी हे खूप प्रतिभाशाली साहित्यिक होते.' अशी कमेंट केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shreyas Iyer: श्रेयस अय्यर आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळाडूंशी संवाद साधण्यास उत्सुक; जपानविरुद्ध ऐतिहासिक टी-२० सामन्याचीही उत्सुकता

ED Raid Karnataka: जारकीहोळींच्या घरी ‘सार्वजनिक’ची कागदपत्रे अन् लाखोंचे परदेशी चलन; ईडीच्या छाप्यात काय काय आढळलं?

बाप तो बाप रहेगा! बाईबद्दल विधान शिंदेंच्या आमदाराला भोवणार, मध्यरात्री गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : खंबाटकी घाटातील नवीन बोगद्यातून वाहतूक सुरू; एकेरी मार्गामुळे आज वाहनांची मोठी कोंडी

Indian Army Success Story: १३ वेळा अपयश, पण जिद्द कायम! १४व्या प्रयत्नात अनिकेत झाला भारतीय सैन्यात लेफ्टनंट, अपयशाला हरवत यशाला गवसणीचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT