sachin tendulkar says Australia mistake after ind beat aus by 6 wickets world cup 2023  sakal
क्रीडा

Ind vs Aus : असे फसले कांगारू...! सचिन पण म्हणतो ऑस्ट्रेलियाला 'ती' चूक पडली महागात

Kiran Mahanavar

India vs Australia : भारतीय क्रिकेट संघाने कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय वर्ल्डकप 2023 ची सुरुवात विजयाने केली आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने सहा गडी राखून विजय मिळवला.

या सामन्यानंतर महान भारतीय खेळाडू सचिन तेंडुलकरचे ट्विट खूप व्हायरल होत आहे. खरं तर, सचिनने आपल्या ट्विटमध्ये सामन्याचे विश्लेषण केले आहे आणि ऑस्ट्रेलियाला कोणती चूक महागात पडली हे सुधा सांगितले आहे.

सचिन तेंडुलकरने आपल्या ट्विटमध्ये ऑस्ट्रेलियन संघाकडून या सामन्यात झालेल्या महत्त्वाच्या चुकांबद्दल सांगताना लिहिले की, नाणेफेक जिंकल्यानंतर कांगारू संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय पाहून मला आश्चर्य वाटले. भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत त्यांना केवळ 199 धावांत रोखले. ऑस्ट्रेलियानेही गोलंदाजी करताना चांगली सुरुवात केली होती, पण मला वाटते की या खेळपट्टीवर त्यांच्याकडे डावखुरी फिरकी गोलंदाज नसल्यामुळे अंदाज चुकला.

या ट्विटमध्ये सचिन तेंडुलकरने भारतीय संघाचे विजयाबद्दल अभिनंदन केले आणि विराट कोहली आणि केएल राहुल यांच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले. सचिनने लिहिले की, विराट आणि राहुल यांच्यातील भागीदारीने आपल्यासाठी सामना जिंकला. खेळपट्टीवर आपली नजर ठेवल्यानंतर त्याने काही चमकदार फटकेही मारले. भारतीय डावात चेंडू नक्कीच बॅटवर आला. चांगल्या सुरुवातीबद्दल #TeamIndia चे अभिनंदन.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात 200 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाने 2 धावांवर 3 विकेट गमावल्या. येथून विराट कोहली आणि केएल राहुल यांनी चौथ्या विकेटसाठी 165 धावांची भागीदारी करून टीम इंडियाचा विजय पूर्णपणे निश्‍चित केला. या सामन्यात कोहली 85 धावांची खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतला, तर राहुल 97 धावा करून शेवटपर्यंत नाबाद राहिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : मराठी माणसाच्या आनंदाला 'रुदाली' म्हणणं ही हिणकस अन् विकृत प्रवृत्ती; उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना सुनावलं...

Latest Maharashtra News Updates : इगतपुरी तालुक्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही पावसाचा जोर कायम

Guru Purnima: या गुहेत ऋषी वेदव्यासांचं वास्तव्य? पुराणकथांना मिळतोय पुरावा!

Video : अजगर आहे की खेळणं? 15 फुटाच्या अजगरासोबत गावकऱ्यांनी बनवल्या रील्स, थरारक व्हिडिओ व्हायरल..

Maharashtra Rain: पालघरला पावसाने झोडपले! नदीला पूर, धरणाचे 5 दरवाजे उघडले, हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT