Sachin Tendulkar Statue At Wankhede Stadium  esakal
क्रीडा

Sachin Tendulkar :वानखेडे ऐतिहासिक, माझा पहिला सामना... सचिन झाला भावूक

अनिरुद्ध संकपाळ

Sachin Tendulkar Statue At Wankhede Stadium : भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 50 वा वाढदिवस मुंबई क्रिकेट असोसिएशन ऐतिहासिक करणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने सचिन तेंडुलकरचा पूर्णाकृती पुतळा वानखेडे स्टेडियमवर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. एमसीए या पुतळ्याचे अनावरण 23 एप्रिलला सचिनच्या 50 व्या वाढदिवसादिवशी करणार आहे.

सचिनचा पुतळा वानखेडे स्टेडियमवर कुठे बसवायचा याची जागा खुद्द सचिन तेंडुलकरनेच निश्चित केली आहे. सचिन तेंडुलकर पत्नी अंजलीसोबत वानखेडे स्टेडियमवर पोहचला होता. त्याच्या सोबत एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे देखील होते.

यावेळी बोलताना सचिन म्हणाला, 'माझ्यासाठी ही एक सुखद भेट आहे. मला याबाबत कोणतीही कल्पना नव्हती. मी स्वतःच्याच पुतळ्याबाबत ऐकून अश्चर्यचकीत झालो आहे.

सचिन पुढे म्हणाला की, माझी कारकीर्द याच मैदनावर सुरू झाली होती. या मैदानावर कधीही विसरली जाणार नाहीत अशा आठवणी जोडल्या गेल्या आहेत. मी माझ्या कारकिर्दीतील सर्वोच्च क्षण 2011 मध्ये याच मैदानावर अनुभवला होता. भारताने वर्ल्डकप जिंकला होता. सचिनने या मैदानावर आपला पुतळा बसवण्यात येणार ही गोष्ट खूप खास आहे.

भारताने ज्या मैदानात 2011 मध्ये वर्ल्डकप जिंकला त्या वानखेडे स्टेडियमवर पहिल्यांदाच कोणत्या तरी खेळाडूचा पुतळा बसवण्यात येणार आहे. वानखेडेवर यापूर्वी एका स्टँडला सचिन तेंडुलकरचे नाव दिले होते. भारतात खेळाडूंचे जास्त पुतळे नाहीत. भारताचे माजी क्रिकेटपटू सीके नायडू यांचे तीन पुतळे वेगवेगळ्या तीन स्टेडियमवर बसवण्यात आले आहेत.

पहिला पुतळा विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये, दुसरा आंध्रप्रदेश आणि तिसरा इंदूरच्या होळकर स्टेडियममध्ये बसवण्यात आला आहे. अनेक खेळाडूंचे वॅक्स स्टॅचू आणि स्टँडला नाव आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"अपमान सहन करून ते कॉरिडॉरमध्ये बसून राहायचे" रंजनाच्या अपघातानंतर अशोक मामांच्या अवस्थेबद्दल खुलासा

Pune Fraud News : शेअर बाजारात चांगल्या परताव्याच्या आमिषाने ज्येष्ठाची दीड कोटींची फसवणूक

Rain-Maharashtra Latest Live News Update: ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प- ईसापुर धरण पाणी पातळी वाढ

Online Gaming Bill 2025 : लोकसभेत 'ऑनलाइन गेमिंग विधेयक-२०२५' मंजूर!

Tirupati Balaji Temple : अशीही बालाजी भक्ती! तिरुपती मंदिरात भाविकाने दान केलं तब्बल १२१ किलो सोनं; किंमत ऐकून थक्क व्हाल....

SCROLL FOR NEXT