सुशील कुमार 
क्रीडा

सुशील कुमारच्या पोलिस कस्टडीत वाढ

नामदेव कुंभार

छत्रसाल स्टेडिमयवरील २३ वर्षीय पैलवान सागर राणा हत्येप्रकरणात (Sagar Dhankar Murder Case) दिल्ली पोलिसांनी दोनवेळचा ऑलिम्पिकवीर सुशील कुमारला (sushil kumar) गेल्या आठवड्यात अटक केली होती. दिल्ली न्यायालयाकडून कुस्तीपटू सुशील कुमारच्या पोलिस कस्टडीत चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे. कोर्टाने यापूर्वी सुशीलला चौकशीसाठी सहा दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवले होते. रिमांडची मुदत संपण्यापूर्वीच त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

यावेळी शहरी दंडाधिकारी मयंक गोयल म्हणाले की, ‘न्यायाच्या हितासाठी मी फक्त चार दिवस पोलिसांच्या अर्जाला परवानगी देणे योग्य मानतो.’ दरम्यान पोलिसांनी सुशील कुमारची सात दिवसांची कोठडी मागितली होती. ४ आणि ५ मे रोजी मध्यरात्री सुशील कुमार आणि त्याच्या साथीदारांनी कुस्तीपटू सागर धनकर आणि त्याचे दोन मित्र सोनू आणि अमित कुमार यांच्यावर हल्ला केला असा आरोप त्याच्यावर आहे.

आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सुशीलला सह आरोपी आरोपी अजय कुमार याच्यासह २३ मे रोजी दिल्लीच्या मुंडका भागात अटक करण्यात आली. तो अटक टाळत होता आणि जवळपास तीन आठवड्यांपासून फरार होता.

काय आहे प्रकरण?

दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमवर 4 मे रोजी पैलवानांच्या दोन गटात हाणामारी झाली होती. यातच सागर राणाचा मृत्यू झाला. याप्रकरणात सुशीलकुमारसह सहा जणांवर प्राथमिक गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून सुशील कुमार फरार होता. दिल्ली मॉडल टाउन परिसरातील एका फ्लॅटवरुन दोन्ही गटात भांडणं झाले होते. सुशील कुमारने याप्रकरणानंतर कोणत्याही पैलवानाचा हात नसल्याचे म्हटले होते. मात्र प्रकरणातील तपासादरम्यान पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुशील कुमार मृत सागरला मारहाण करताना दिसून आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT