Sania Mirza Tennis Profile esakal
क्रीडा

Sania Mirza : ग्रँडस्लॅम विजयाचा 'षटकार' मारणारी सानिया टेनिस कोर्टला करणार अलविदा!

अनिरुद्ध संकपाळ

Sania Mirza Tennis Profile : भारताची स्टार महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने आठवड्याभरापूर्वीच आपल्या निवृत्तीबाबतची योजना सांगितली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने दुबईत फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या WTA 1000 स्पर्धेनंतर निवृत्ती घेणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान, सानियाने ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धा सुरू होण्यापूर्वी एक भावनिक पत्र लिहिले. त्या तिने यंदाची ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धा ही कारकिर्दितील शेवटची स्पर्धा असणार आहे असे सांगितले. ऑस्ट्रेलिया ओपन ही 16 जानेवारी पासून सुरू होत आहे.

या स्पर्धेपूर्वी सानियाने 'लाईफ अपडेट' अशा नावाने सोशल मीडिया पोस्ट शेअर केली. सानियाने आपल्या अधिकृत वक्तव्यात म्हणाली की, 'तीस वर्षापूर्वी हैदराबादमधील नासर शाळेची 6 वर्षाची एक मुलगी टेनिस शिकण्यासाठी कोर्टवर पाय ठेवलते. स्वप्नांसाठी लढण्याची सुरूवात ही 6 व्या वर्षापासून झाली. प्रतिकूल परिस्थितीतही या मुलीने ग्रँड स्लॅममध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न पाहिले.'

सानिया पुढे म्हणते की, 'आता मी माझ्या कारकिर्दिचा मागोवा घेते त्यावेळी असे दिसते की मी फक्त 50 ग्रँड स्लॅम खेळल्या नाहीत तर मला देवाच्या कृपेने त्यातील अनेक ग्रँडस्लॅम जिंकण्याचे भाग्य देखील लाभले.'

सानिया मिर्झाचा ग्रँडस्लॅम विजयी षटकार

2009 - ऑस्ट्रेलियन ओपन - मिश्र दुहेरी

2012 - फ्रेंच ओपन - मिश्र दुहेरी

2014 - युएस ओपन - मिश्र दुहेरी

2015 - विम्बल्डन - महिला दुहेरी

2015 - युएस ओपन - महिला दुहेरी

2016 - ऑस्ट्रेलियन ओपन - महिला दुहेरी

एशियन गेममध्येही सानियाने जिंकली बक्कळ पदके

बुसान 2002 - मिश्र दुहेरी - कास्य

दोहा 2006 - महिला दुहेरी - रौप्य

दोहा 2006 - मिश्र दुहेरी - सुवर्ण

दोहा 2006 - महिला सांघिक - रौप्य

गुआनझोह 2010 - महिला एकेरी - कास्य

गुआनझोह 2010 - मिश्र दुहेरी - रौप्य

इंटन 2014 - महिला दुहेरी - कास्य

इंटन 2014 - मिश्र दुहेरी - सुवर्ण

सानिया मिर्झाने कमावलेले पुरस्कार

2004 - अर्जुन पुरस्कार

2006 - पद्म पुरस्कार

2015 - मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार

2016 - पद्म भुषण

(Sports Latest News)

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मंत्रालयातच चोरी, मंत्र्याच्या कॅबिनमधून ८० हजार रुपये लंपास...

IPL 2026: हार्दिक पांड्या CSK कडून खेळणार? '०७:०७' पोस्ट अन् Mumbai Indians चा कॅप्टनची चर्चा... नेमकी भानगड काय?

Thane Crime: ‘प्रेम’ बनलं सापळा! १४० हून अधिक तरुणींची फसवणूक; ‘लव्ह स्कॅम’चा मास्टरमाइंड अटकेत

माझ्या नवऱ्यानेदेखील त्या बातम्या वाचल्या... मित्रांसोबत अफेअरच्या चर्चांवर पूजा सावंतने सोडलं मौन; म्हणाली-

Latest Marathi News Live Update : बाजारात इलेक्ट्रिक दुचाकीं खरेदीकडे नागरिकांचा कल

SCROLL FOR NEXT