Sania Mirza Mohammed Shami esakal
क्रीडा

Sania Mirza Mohammed Shami : सानिया अन् मोहम्मद शमी करणार निकाह.... इम्रान मिर्झा स्पष्टच बोलले

अनिरुद्ध संकपाळ

Sania Mirza Mohammed Shami : सानिया मिर्झा आणि मोहम्मद शमी हे भारताचे सर्वात यशस्वी खेळाडू आहेत. सानियाने टेनिस जगतात आपलं अन् देशाचं नाव मोठं केलं. सानिया ही भारताची महान महिला टेनिसपटू आहे. तर मोहम्मद शमी हा भारतीय क्रिकेट संघाचा एक प्रमुख गोलंदाज असून त्यानं 2023 च्या वनडे वर्ल्डकपमध्ये दमदार गोलंदाजी केली होती. या कामगिरीच्या जोरावर भारताने अंतिम सामन्यात धडक मारली होती.

दरम्यान, काही दिवसांपासून मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झा हे दोघे लग्न करणार असल्याची अफवा पसरली होती. आता यावर सानियाच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली.

सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांचा या वर्षाच्या सुरूवातीला घटस्फोट झाला आहे. शमीचा देखील त्याची पत्नी हसीन जहाँसोबत काडीमोड झाला आहे. त्यामुळं या दोघांची नावे एकमेकांसोबत जोडली जाऊ लागली. माध्यमांमध्ये याबाबत बातम्या येऊ लागल्यानंतर सानिया मिर्झाच्या वडिलांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

सानिया मिर्झाचे वडील इम्रान मिर्झा यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले की, 'या सर्व बातम्या चुकीच्या आहेत. सानिया मोहम्मद शमीला कधी भेटलेली सुद्धा नाहीये.'

सानिया मिर्झा ही पवित्र हजच्या यात्रेवर गेली होती. पाच महिन्यापूर्वीच तिने शोएब मलिकसोबत घटस्फोट घेतला होता. याचबरोबर सानियाने व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती देखील जाहीर केली होती. नुकतेच तिने फ्रेंच ओपनमध्ये विश्लेषक म्हणून काम केलं.

आपल्या सोशल मीडियावरील पोस्टवर सानिया म्हणते की, 'मी बदलणाऱ्या आयुष्याचा अनुभव घेत आहे. मी अल्लाहकडे माझ्या चुकांबद्दल विनंम्रपणे माफी मागते. आशा आहे की अल्ला माझी प्रार्थना कबुल करेल आणि मला मार्गदर्शन करून आशीर्वाद देईल.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! शैक्षणिक सहलींसाठी विद्यार्थ्यांसाठी सहलीत ५० टक्के सवलत; प्रत्येकास १० लाखांचा अपघात विमाही; एसटी महामंडळाचे आगारप्रमुख जाणार शाळांमध्ये

आजचे राशिभविष्य - 19 नोव्हेंबर 2025

Horoscope Prediction : आज तयार होतोय अमला राजयोग; मेष आणि या पाच राशींच्या आर्थिक अडचणींना लागणार पूर्णविराम !

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात रवा पिझ्झा बॉल ट्राय केले का? लगेच लिहून घ्या रेसिपी

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 19 नोव्हेंबर 2025

SCROLL FOR NEXT