Sania-Shoaib Love Story esakal
क्रीडा

Sania-Shoaib Love Story : पहिल्या भेटीत सानियाने शोएबला भावही दिला नाही अन् मग...

पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सच्या माध्यामातून ही गोष्ट समोर आली असून याविषयी वेगवेळ्या चर्चा रंगत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Sania Mirza and Shoaib Malik : भारतीय टेनिसस्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्या नात्यात आलेल्या कटूताने त्यांचं नातं तुटण्याच्या वाटेवर आहे. पाकीस्तानी मीडिया रिपोर्ट्सच्या माध्यामातून ही गोष्ट समोर आली असून याविषयी वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत.

टेनिस आणि क्रिकेटची १० वर्षांपूर्वी कशी जमली जोडी जाणून घेऊया.

एका पाकिस्तानी शोमध्ये इंटरव्ह्यूमध्ये शोएब आणि सानियाने काही गोष्टी शेअर केल्या होत्या. शोएबने सांगितलं की, ते दोघे २००३मध्ये पहिल्यांदा भेटले होते. तेव्हा सानियाने त्याला बिलकूल भाव दिला नव्हता. पण यावर सानिया म्हणाली क्रिकेटर्सची प्रतिमा कशी आहे तुम्हाला माहित आहे. अशात मी सांभाळून राहत होते.

त्यांच्यात पुन्हा बोलणं २००९ मध्ये सुरू झालं. त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या होबार्टमध्ये ते एकमेकांना भेटले. संवाद सुरू झाला आणि लग्नापर्यंत पोहचला.

शोएब आणि सानियाचं लग्न १२ एप्रिल २०१० मध्ये पारमपरिक पध्दतीने हैद्राबादमध्ये झालं होतं. त्यानंतर ८ वर्षांनी २०१८ मध्ये त्यांचा मुलगा इजहान मिर्झा मलिकचा जन्म झाला. इजहान आता ४ वर्षांचा आहे.

एकमेकांच्या कल्चरमुळे काही अडचणींविषयी सानिया म्हणाली होती की, सुरुवातीला त्रास झाला कारण मी हैद्राबादी आणि शोएब पंजाबी वातावरणात वाढलेला आहे.

जेव्हा पण भारत-पाक मॅच असते तेव्हा सानिया-शोएब कोणाला सपोर्ट करणार हा प्रश्न असतोच. यावर सानिया म्हणते की, लोकांना वाटतं की, पाकिस्तान जिंकल्यावर मी शोएबला बाहेर सोफ्यावर झोपायला सांगावं.

सध्यस्थितीवर बोलायचं झालं तर पाकिस्तानी मीडिया रिपोर्टनुसार शोएबने आपल्या एका टी. व्ही शो मध्ये सानियाला कथितरित्या फसवलं आहे. पण यावर अजून दोघांकडून काहीही प्रतिक्रीया आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT