KL Rahul Asia Cup 2023 esakal
क्रीडा

KL Rahul Asia Cup 2023 : ... तर केएल राहुल भारतीय संघात दिसलाच नसता; संजय बांगरने केला गौप्यस्फोट

अनिरुद्ध संकपाळ

KL Rahul Asia Cup 2023 : बीसीसीआयने नुकतेच आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा केली. दुखापतीतून सावरत असलेल्या केएल राहुल, श्रेयस अय्यर या दोघांचा संघात समावेश करण्यात आला आहे. आशिया कप हा वर्ल्डकपची रंगीत तालीम असणार आहे. याच स्पर्धेत भारतीय संघात दुखापतीनंतर परतणाऱ्या केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्या मॅच फिटनेसची टेस्ट होणार आहे.

दरम्यान, भारताचा माजी खेळाडू आणि फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर याने केएल राहुल बाबत एक मोठे वक्तव्य केलं. त्याने केएल राहुल हा भारतीय संघात आहे कारण तो विकेटकिपर फलंदाज म्हणून खेळतोय. नाही तर त्याला संघात स्थान मिळालं नसतं असं वक्तव्य केलं. तसेच त्याने भारताची यंदाच्या वर्ल्डकपसाठीची रणनिती देखील स्पष्ट केली.

स्टार स्पोर्ट्सशी बोलताना संजय बांगर म्हणाला की, 'मला वाटतं की संघातील समतोल हा विकेटकिपर बॅट्समनमुळे निर्माण होत आहे. कारण आपल्या संघातील पहिले पाच खेळाडू हे गोलंदाजी करू शकत नाहीत. त्यामुळे तुम्हाला 6 बॉलिंग पर्याय हवे असतील कर तुम्हाला तुमच्या पहिल्या 5 फलंदाजापैकी एकाने गोलंदाजी करणे गरजेचे आहे किंवा त्यातील एक विकेटकिपर असणे गरजेचे आहे.'

'त्यामुळे मला वाटतं की केएल राहुल हा विकेटकिपिंग बॅट्समनची भुमिका निभावेल. माझ्या मते त्यालाच प्लेईंग 11 मध्ये जागा मिळेल. कारण अशा प्रकारेच भारतीय संघात चांगला समतोल साधला जाऊ शकतो.'

केएल राहुलच्या फिटनेसबाबत अनेक शंका व्यक्त केल्या जात आहेत. आशिया कपमध्ये भारताचा पहिलाच सामना हा पाकिस्तानविरूद्ध 2 सप्टेंबरला होणार आहे. अजित आगरकरने केएल राहुलला छोटी दुखापत झाल्याचे सांगितले.

दरम्यान, बांगर केएल राहुलच्या संघातील स्थानाबाबत म्हणाला की, 'जर केएल राहुल फलंदाज म्हणून फिट झाला नाही तर इशान किशन हा विकेटकिपर म्हणून चांगला पर्याय आहे. वनडे क्रिकेटमध्ये भारतीय संघ कोठेही खेळत असो ते फिट खेळाडू आणि अव्वल दर्जाचा विकेटकिपरच खेळवणार या शंका नाही.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT