Sanjay Manjrekar Says Ravindra Jadeja doesn't Fit In T20 World Cup Indian Team  esakal
क्रीडा

मांजरेकरांनी जडेजाला पुन्हा डिवचले; म्हणे टी 20 वर्ल्ड कप संघात बसतच नाही!

अनिरुद्ध संकपाळ

ऑस्ट्रेलियात काही महिन्यात होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया संघबांधणीच्या तयारीत लागली आहे. सध्या संघ व्यवस्थापन विविध टीम कॉम्बिनेशन चाचपून पाहत आहे. दरम्यान, भारताचे माजी फलंदाज आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी रविंद्र जडेजाला पुन्हा डिवचले. त्यांच्या मते रविंद्र जडेजाला टी 20 वर्ल्डकप संघात स्थान मिळणे खूप आवघड आहे. (Sanjay Manjrekar Says Ravindra Jadeja doesn't Fit In T20 World Cup Indian Team)

संजय मांजरेकर म्हणातात की, 'गेल्या काही दिवसांमध्ये दिनेश कार्तिकने दाखवून दिले आहे की तो भारतासाठी 6 किंवा 7 व्या क्रमांकावर चांगल्या प्रकारे फलंदाजी करू शकतो. टी 20 क्रिकेटमध्ये त्याने आपल्या खेळीमुळे सर्वांना प्रभावित केले आहे.'

मांजरेकर पुढे म्हणाले की, 'रविंद्र जडेजा सारख्या अष्टपैलू खेळाडूला आता टी 20 संघात स्थान मिळवणे कठिण झाले आहे. अक्षर पटेल सारखा खेळाडू जडेजाच्या पुढे चालला आहे. संघात हार्दिक पांड्या देखील परत आला आहे. दिनेश कार्तिक देखील आहे. याचबरोबर मधल्या फळीत ऋषभ पंत देखील आहे. रविंद्र जडेजाबाबत बोलायचे झाले तर त्याला संघात सहजासहजी जागी मिळणार नाही.'

जडेजाचा खराब आयपीएल हंगाम

गेले काही दिवस रविंद्र जडेजासाठी फारसे चांगले गेलेले नाहीत. आयपीएलमध्ये त्याला सीएसकेचा कर्णधार करण्यात आले. मात्र त्याची कामगिरी सर्वसाधारण होती. एक अष्टपैलू म्हणून देखील त्याला आपली छाप पाडता आली नाही. त्यानंतर दुखापतीमुळे तो संघातून बाहेर गेला. आता इंग्लंड दौऱ्यावर त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा केल्या जात आहेत.

यंदाचा टी 20 वर्ल्ड कप ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणार आहे. या दरम्यान, भारतीय संघ अनेक टी 20 मालिका खेळणार आहे. वर्ल्ड कपसाठीचा संघ कसा असेल याची झलक इंग्लंड दौऱ्यावर पहावयास मिळणार आहे. संघात मधल्या फळीत आणि फिनिशरच्या जागेवर चांगलीच स्पर्धा निर्माण झाली आहे. दिनेश कार्तिकच्या येण्यामुळे ऋषभ पंतची देखील डोकेदुखी वाढली आहे. हार्दिक पांड्या संघात परतल्यामुळे रविंद्र जडेजावर टांगती तलवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivdeep Lande contest Bihar Election: ‘सिंघम’ शिवदीप लांडे यांचीही आता बिहारच्या निवडणूक रिंगणात उडी; उमेदवारी अर्ज दाखल करणार!

EPFO New Option : 'ईपीएफओ' सदस्यांना मिळाला नवा पर्याय! आता 'PF' रक्कम पेन्शन खात्यात वळवता येणार

ब्रेकिंग! साहेबांच्या नावाने लाच मागणारा एजंट ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात; मयताच्या भावाकडे, पत्नीकडे पीएफ, पेन्शन काढून देण्यासाठी मागितले २५००० रुपये

Ajit Pawar : जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी करण्याचे उपमुख्यमंत्री पवार यांचे आदेश

Supreme Court : मृत्युदंडाच्या पद्धतीवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्रावर नाराजी

SCROLL FOR NEXT