Sanju Samson india vs south africa 1st t20i match
Sanju Samson india vs south africa 1st t20i match  sakal
क्रीडा

Sanju Samson : पहिल्या ODI सामन्यात 'या' खेळाडूंमुळे संजूच्या मेहनतीवर फेरले पाणी

Kiran Mahanavar

Sanju Samson India vs South Africa First ODI: भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेत 9 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. यासह दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताकडून 3 फ्लॉप खेळाडूंनी अतिशय खराब कामगिरी केले. या खेळाडूंमुळे टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या वनडे सामन्यात भारताच्या पराभवाचे हे खेळाडू कारणीभूत ठरले आहेत. त्याने संजू सॅमसनच्या मेहनतीवर पाणी फेरले.

संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 63 चेंडूत 86 धावा केल्या, ज्यात 9 चौकार आणि तीन लांब षटकारांचा समावेश होता. टीम इंडियाला मात्र तो विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. त्याने आपल्या झंझावाती खेळीने सर्वांची मने जिंकली. तो शेवटपर्यंत क्रीजवर नाबाद राहिला.

रवी बिश्नोईने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले, मात्र खराब खेळामुळे तो टीम इंडियासाठी मोठी डोकेदुखी ठरला. पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने भरपूर धावा लुटल्या. चार षटकात 69 धावा दिल्या. रवी बिश्नोई मधल्या षटकांमध्ये धावांवर लगाम लावण्यात अपयशी ठरला. टीम इंडियाच्या पराभवामागे रवी बिश्नोई हे मोठे कारण ठरला आहे.

दुसरा इशान किशन - पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याला चौथ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाली. पण तो आपल्या खेळाने छाप पाडू शकला नाही. तो बाद होताच फलंदाजांवरील दडपण वाढले. त्याने 37 चेंडूत फक्त 20 धावा केल्या. खराब फॉर्ममुळे इशान किशनला 2022 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्येही स्थान मिळालेले नाही.

तिसरा आहे ऋतुराज गायकवाड - दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार शिखर धवनने प्रथमच ऋतुराज गायकवाडला वनडेत संधी दिली. मात्र त्याने आपल्या कामगिरीने सर्वांची निराशा केली. टीम इंडियाच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये तो कमकुवत दुवा ठरला. त्याने आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच अतिशय खराब खेळ दाखवला. जेव्हा त्याच्यावर धावा काढण्याची महत्त्वाची जबाबदारी होती. त्याने 42 चेंडूत केवळ 19 धावा केल्या, त्याच्या संथ फलंदाजीमुळे टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूर हळहळलं! खरेदीसाठी गेल्या जवानांवर काळाचा घाला, भीषण अपघातात दोंघाचा मृत्यू; ऑटोचालकासह सहा जवान गंभीर जखमी

Shikhar Dhawan: लेकाच्या विरहानं शिखर व्याकुळ; फादर्स डेच्या शुभेच्छा देताना म्हणाला, 'त्याच्याशी बोललो नाहीये...'

Jerusalem : दिवसाउजेडी हल्ले थांबवणार; गाझातील मदतकार्याच्या सोयीसाठी इस्राईलकडून घोषणा

Russia-Ukraine Conflict : ‘युक्रेन’बाबत स्वित्झर्लंडमध्ये बैठक; रशियाच्या अनुपस्थितीने तोडग्याची शक्यता कमीच

Prataprao Chikhlikar: मनोज जरांगेंची हवा नांदेडपर्यंत...! प्रतापराव चिखलीकरांचा गेम कसा झाला?

SCROLL FOR NEXT