क्रीडा

सलामीला महाराष्ट्राचे मिझोरामसमोर नमते

सकाळवृत्तसेवा

पणजी - नियोजनबद्ध आणि चपळ खेळ केलेल्या मिझोरामसमोर महाराष्ट्राला संतोष करंडक फुटबॉल स्पर्धेच्या "ब' गटात सोमवारी नमते घ्यावे लागले. बांबोळी येथील ऍथलेटिक्‍स स्टेडियमवर झालेल्या या लढतीत ईशान्य भारतातील संघाने 3-1 असा चमकदार विजय प्राप्त केला.

मिझोरामने पूर्वार्धातील खेळात 2-1 अशी आघाडी मिळविली होती. त्यांच्यासाठी सातव्या मिनिटास व्ही. लालचुआनॉमा वनछॉंग याने, 43व्या मिनिटास लालफाकझुआला फाकझुआला याने, तर 51व्या मिनिटास लालसांगबेरा सांगबेरा याने प्रत्येकी एक गोल नोंदविला. महाराष्ट्राचा एकमात्र गोल 11व्या मिनिटास संघातील 21 वर्षांखालील खेळाडू राहुल दास याने केला. सामन्याच्या 78व्या मिनिटास मिझोरामच्या लालबियाखलुआ याला अगदी सोपी संधी होती; पण तो नियंत्रित फटका मारू शकला नाही, त्यामुळे त्यांचा विजय 3-1 फरकापुरता मर्यादित राहिला.

गतवर्षी स्पर्धेत उपविजेत्या आणि तीन वेळच्या माजी विजेत्या महाराष्ट्राला आज सूर गवसला नाही. गॉडफ्रे परेरा यांच्या मार्गदर्शनाखालील संघाच्या खेळात समन्वयाचा अभाव होता. त्याचा लाभ मिझोरामने उठविला. महाराष्ट्राच्या सेबिन व्हर्गिस याने "बॅकहेड'द्वारे गोलरक्षक हर्षद मेहेर याच्याकडे चेंडू देण्याचा प्रयत्न केला; पण गोलरक्षक चेंडू रोखण्यात सपशेल अपयशी ठरला. ही संधी साधत लालछुआनॉमा याने मिझोरामचे खाते उघडले. मिझोरामच्या बचावफळीतील चुकीचा लाभ उठवत राहुल दासने महाराष्ट्रास बरोबरी साधून दिली. अर्धा तासाच्या खेळानंतर महाराष्ट्राला आघाडीची संधी होती; परंतु अभिषेक आंबेकर योग्यवेळी चेंडूला हेडरने अचूक दिशा दाखवू शकला नाही. नंतर मात्र 2013-14 मध्ये ही स्पर्धा जिंकलेल्या मिझोरामने महाराष्ट्राला वरचढ होऊ दिले नाही.

विश्रांतीला दोन मिनिटे बाकी असताना मिझोरामने आघाडी वाढविली. लालबियाखलुआ याच्या "असिस्ट'वर फाकझुआला याची "व्हॉली' अडविताना गोलरक्षक हर्षद पुरता गडबडला व गोलबरोबरीची कोंडी फुटली. उत्तरार्धातील खेळ सुरू झाल्यानंतर सहाव्या मिनिटास मिझोरामची आघाडी 3-1 अशी मजबूत झाली. "विंग'मध्ये मेहनत घेतलेल्या सांगबेरा याला यश मिळाले. फाकझुआला याच्या शानदार "असिस्ट'वर सांगबेरा याने महाराष्ट्राच्या गोलरक्षकाला अजिबात संधी दिली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Elections : निवडणुकीआधीच वंचितने काँग्रेसचा गेम कसा केला? जागा आहेत, पण उमेदवार नाहीत… आता काय?

Viral Video: हत्तीचा ‘परफेक्ट हेअर फ्लिप’ क्षण कॅमेऱ्यात कैद! व्हिडिओ पाहून हसून लोटपोट व्हाल

Nashik Municipal Election : नाशिक भाजपमध्ये 'एबी' फॉर्मचा राडा; विल्होळीत कार्यकर्त्यांचा उद्रेक, तोडफोड आणि पाठलाग!

चक्क पाण्यावर चालणार सायकल! 'इंजिनिअर अरविंद देठेंचा नाविन्यपूर्ण उपक्रम, सायकल चालवून वेगळाच आनंद लुटता येणार..

Latest Marathi News Update : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोस्टर वॉर

SCROLL FOR NEXT