Sara Tendulkar Not But Shubman Gill Went On Date With This Celebrity wtc final cricket news in marathi kgm00  
क्रीडा

Shubman Gill : सारा तेंडुलकर नाही तर 'या' सेलिब्रिटीसोबत शुभमन गेला होता डेटवर; व्हिडिओ व्हायरल

क्रिकेटपटू शुभमन गिल सध्या इंग्लंडमध्ये असून फायनलसाठी तयारी करत आहे पण त्याआधी…

Kiran Mahanavar

Shubman Gill WTC Final 2023 : क्रिकेटर शुभमन गिल सध्या इंग्लंडमध्ये आहे, तेथे तो 7 जूनपासून खेळल्या जाणार्‍या WTC फायनलची तयारी करत आहे. मात्र गिल सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल आहे.

त्याचे एक रील सोशल मीडियावर फिरत आहेत. गिल क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरला डेट करत असल्याची चर्चा आहे. नुकत्याच आलेल्या व्हिडिओमध्ये गिल डेटवर आहे पण ती सारा नसून दुसरी कोणीतरी मुलगी आहे.

शुभमन गिलसाठी गेले काही महिने अप्रतिम गेले आहेत. त्याच्या बॅटने आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली. गिल केवळ त्याच्या कामगिरीमुळेच नाही तर त्याच्या नात्यामुळेही चर्चेत राहतो.

गिल सचिनची मुलगी सारा हिला डेट करत असल्याची चर्चा आहे. गिल नुकताच इंग्लंडला पोहोचला, त्याचा स्क्रीनशॉट सध्या व्हायरल होत आहे. हा स्क्रीनशॉट साराचा सांगितला जात आहे, ज्यामध्ये ती इंग्लंडलाही पोहोचली आहे.

काही काळापूर्वी गिल आणि सारा अली खान यांच्या नात्याच्या अफवाही पसरल्या होत्या. दोघेही रेस्टॉरंटमध्ये एकत्र दिसले होते, त्यानंतर फ्लाइटमध्येही ते एकत्र दिसले होते.

शुभमन गिल सोशल मीडिया इन्फ्लुएंसर निहारिका एनएमसोबत मजेदार डेटवर गेला. निहारिकाने काही व्हिडिओ तिच्या यूट्यूब चॅनलवर शेअर केले आहेत. यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले – मला माहित नाही, ही डेट आहे की मॅजिक शो.

खंर तर ही डेट नव्हती, तर स्पायडरमॅनसाठी प्रमोशनल शूट होते. व्हिडिओमध्ये शुभमन गिल निहारिकाचे कौतुक करताना दिसत आहे. यानंतर गिलने निहारिकाला विचारले, तू काही खेळ खेळतोस का? यावर ती म्हणते की मी कॅरम खेळते असे सांगितल्यावर गिल निराज होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT