ICC Test Rankings Sarfaraz Khan Marathi news sakal
क्रीडा

ICC Test Rankings : सर्फराज खानने पदार्पणासह ICC कसोटी क्रमवारीत मारली एन्ट्री! दिग्गजांना टाकले मागे

Sarfaraz Khan News : देशांतर्गत क्रिकेटमध्ये मोठे पराक्रम करणारा युवा फलंदाज सर्फराज खानला राजकोटमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली.

Kiran Mahanavar

ICC Test Rankings Sarfaraz Khan : देशांतर्गत क्रिकेटमध्ये मोठे पराक्रम करणारा युवा फलंदाज सर्फराज खानला राजकोटमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली. सर्फराजने कर्णधार रोहितच्या भरवशावर सार्थ ठरवत दोन्ही डावात अर्धशतके झळकावली. अशाप्रकारे पदार्पणाच्याच सामन्यात अर्धशतक करणारा सर्फराज चौथा भारतीय ठरला. एवढेच नाही तर तो आयसीसी क्रमवारीतील टॉप 100 खेळाडूंच्या यादीत ही सामील झाला आहे.

सर्फराज खानने इंग्लंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात पदार्पण केले. राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्याच्या पहिल्या डावात सर्फराज खानने 62 धावांची शानदार खेळी केली. यामध्ये त्याच्या बॅटमधून 9 चौकार आणि एक गगनभेदी षटकार मारला. यानंतर जेव्हा तो दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आला तेव्हा त्याने तिथेही धमाका सुरूच ठेवला. यावेळी सर्फराजने 72 चेंडूत 68 धावा केल्या. त्याने 6 चौकार आणि तीन षटकार मारले. त्यामुळेच पदार्पणाबरोबरच तो आयसीसी क्रमवारीत अव्वल 100 जणांच्या यादीत सामील झाला आहे.

सर्फराज खान सध्या आयसीसी कसोटी क्रमवारीत 75व्या स्थानावर आहे. त्याचे रेटिंग 419 आहे. मोठी गोष्ट म्हणजे भारताशिवाय जगभरातील अनेक महान खेळाडूंच्या यादीत त्यांचा समावेश झाला आहे. टॉप 100 रँकिंगच्या यादीत त्याने भारतीय संघातील स्टार खेळाडूंपैकी एक असलेल्या रविचंद्रन अश्विनला मागे टाकले आहे. जो सध्या 394 च्या रेटिंगसह 80 व्या स्थानावर आहे. त्याचबरोबर त्याने मार्को जॅनसेन, रचिन रवींद्र आणि तेज नारायण चंद्रपॉल यांनाही मागे टाकले आहे.

सर्फराजने यापूर्वी आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले नाहीत, त्यामुळे इंग्लिश गोलंदाजाला त्याच्या फलंदाजीची शैली फारशी माहिती नव्हती. आता सर्फराजने एक सामना खेळला आहे आणि इंग्लंडने त्याची फलंदाजीची शैली पाहिली आहे, त्यामुळे पुढील सामन्यात ते त्या रणनीतीनुसार त्याला गोलंदाजी करतील. अशा परिस्थितीत तो रांची कसोटी सामन्यात कशी कामगिरी करतो हे पाहणे रंजक ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT