Sarfaraz Khan sakal
क्रीडा

Sarfaraz Khan: संघाच्या घोषणेनंतर सरफराज खानची इंस्टाग्राम स्टोरी व्हायरल! चर्चेला उधाण

Kiran Mahanavar

IND vs AUS Sarfaraz Khan : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शुक्रवारी रात्री न्यूझीलंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने स्फोटक खेळ करणाऱ्या पृथ्वी शॉला अखेर टी-20 संघात स्थान मिळाले, तर ऋषभ पंतच्या वगळल्यामुळे ईशान किशन आणि सूर्यकुमार यांची कसोटी संघात निवड झाली.

याशिवाय असे एक नाव होते की, जे संघात नाही त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले. हा खेळाडू दुसरा कोणी नसून मुंबईचा सरफराज खान आहे. सरफराज गेल्या काही वर्षांपासून लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये शानदार फलंदाजी करत आहे. त्याची सरासरी इतकी चांगली आहे की त्याला भारतीय ब्रॅडमन म्हटले जात आहे, परंतु तरीही त्याला संघात स्थान मिळत नाही.

सर्फराजकडे दुर्लक्ष करण्यात आल्यानंतर अनेक भारतीय चाहते सोशल मीडियावर बीसीसीआयवर टीका करत आहेत. दरम्यान सरफराजने त्याच्या इंस्टाग्रामवर काही स्टोरी शेअर केली आहे जी खूप व्हायरल होत आहे. खरं तर सरफराज खानने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर देशांतर्गत क्रिकेटची आकडेवारी शेअर केली आहे.

पहिल्या फोटोमध्ये सरफराजने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील किमान 50 सामन्यांमध्ये सर्वाधिक फलंदाजी सरासरीचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्याचे नाव महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांच्यापेक्षा अगदीच कनिष्ठ आहे. बॅडमॅनची फलंदाजीची सरासरी 95.17 होती, तर सरफराजने या काळात 80.47 च्या सरासरीने धावा केल्या.

तर दुसऱ्या फोटोमध्ये त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटची आकडेवारी शेअर केली आहे. हे आकडे त्याच्या पहिल्या 30 प्रथम श्रेणी सामन्यांचे आहेत. सर्फराजने या काळात 110.73 च्या सरासरीने 2436 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने त्रिशतकाशिवाय 9 शतकी खेळी खेळली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT