Aditi Swami wins Gold Medal in Asian Games China esakal
क्रीडा

Asian Games : कष्टाचं झालं चीज! आशियाई क्रीडा स्पर्धेत आदितीचा 'सुवर्णवेध'; देदीप्यमान यशाने आई-वडील भारावले

आशियाई क्रीडा स्पर्धेत सातारकर आदिती स्वामीने आज देशाला आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिले.

सकाळ डिजिटल टीम

गेली तीन वर्षे आदिती तहानभूक विसरून यशासाठी मेहनत घेत होती.

नागठाणे : चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games) सातारकर आदिती गोपीचंद स्वामी (Aditi Gopichand Swami) हिने आज देशाला आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिले. तिरंदाजीतील (Archery) महिला सांघिक विभागात तिने देदीप्यमान यश पटकाविले. या यशामुळे तिचे आई-वडील भारावून गेले आहेत.

आदितीचे वडील गोपीचंद स्वामी यांनी ‘सकाळ’शी बोलताना आपल्या भावनांना वाट करून दिली. गेल्या अनेक दिवसांपासून पाहिलेले स्वप्न आज साकार झाले. जागतिक विक्रमापाठोपाठ देशासाठी तिने बजावलेली ही अतुलनीय कामगिरी आमचा आनंद द्विगुणित करणारी आहे, असे त्यांनी सांगितले.

आदितीसह भारतीय संघ सुवर्णपदक पटकाविणार, याची आम्हा कुटुंबीयांना खात्री होती. मात्र, त्याबरोबरच एक चुकीचा बाणदेखील पदकाला हुलकावणी देऊ शकतो, याचीही जाणीव होती. श्री. स्वामी म्हणाले, ‘‘पहाटे पाच वाजल्यापासून आम्ही सामना पाहण्यासाठी सज्ज होतो. आज एकाच दिवशी उपांत्यपूर्व, उपांत्य अन् अंतिम फेरीचे सामने होते, त्यामुळे मनात काहीशी धाकधूक होती. निकाल काय लागेल, याविषयीही चिंता होती.

ऐनवेळी वातावरणात बदल झाल्यामुळे वाऱ्याचा वेगही वाढला होता. त्यातून खेळाडूंना अचूक नेम साधता येत नव्हता. अशा प्रतिकूल परिस्थितीतही भारतीय संघाने कमालीची जिद्द दाखविली. केवळ एक अंकाच्या फरकाने त्यांनी चिनी तैपेई संघावर विजय मिळविला.’’ गेली तीन वर्षे आदिती तहानभूक विसरून यशासाठी मेहनत घेत होती. तिच्या या कष्टाचे चीज झाले. आई-वडील म्हणून तिच्या या कामगिरीचा अभिमान वाटतो, असे आदितीची आई शैला स्वामी यांनी नमूद केले.

असाही दुग्धशर्करा योग

सातारकर असणारे प्रवीण सावंत हे भारतीय संघाचे प्रशिक्षक. इटलीचे सर्जीओ पेग्नी या परदेशी प्रशिक्षकांसोबत सध्या ते भारतीय संघासोबत आहेत. त्यांच्यासाठी आज दुग्धशर्करा योग होता. पुरुषांच्या सांघिक विभागात त्यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणारा ओजस देवतळे यानेही सुवर्णपदक पटकाविले. कालही त्यांनी मिश्र सांघिक विभागात सुवर्णपदक पटकाविले होते. या यशामुळे सावंत खुश होते. या यशाच्या निमित्ताने साताऱ्याच्या नावाची नोंद क्रीडा इतिहासात झाली. आजचा हा क्षण अभिमानास्पद अन् अविस्मरणीय आहे, असे त्यांनी हांग चौऊ येथून ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: शरीरावर जखमा, फाटलेले कपडे, पुरूषाची चप्पल... रेल्वे स्थानकाजवळ अज्ञात महिलेचा अर्धनग्न मृतदेह अन्..., नेमकं काय घडलं?

कलाकार खूप फॅन्सी जेवतात? मुळीच नाही, गिरीजा ओकने दाखवलं जेवणाचं ताट; वरणभात, अळूवडी अन्...

Latest Marathi Breaking News:विहिरीत पडला बिबट्या, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

Mumbai News: ‘एल्फिन्स्टन’मुळे म्हाडा मालामाल! ८३ घरांच्या माध्यमातून मिळणार तब्बल ९६ कोटी रुपये

"आणि मी कारमधील गणपतीची ओरबाडून काढून फेकली" जुई गडकरीने सांगितला तो प्रसंग; "मी हॉस्पिटलमध्ये.."

SCROLL FOR NEXT