Sport sakal
क्रीडा

Sport News : सात्विक-चिराग यांनी घेतली जागतिक बॅडमिंटन दुहेरीत दुसऱ्या स्थानावर प्रथमच झेप

जागतिक बॅडमिंटन दुहेरीत दुसऱ्या स्थानावर प्रथमच झेप

सकाळ वृत्तसेवा

Badminton Championship - समोर कितीही तडगे प्रतिस्पर्धी असले किंवा परिस्थिती प्रतिकूल असली तरीही गेल्या काही महिन्यांत एकेक स्पर्धा जिंकत आणि शिरपेचात मानाचे नवे तुरे खोवत असलेले भारताचे दुहेरीतील साथीदार सात्विक आणि चिराग शेट्टी यांनी जागतिक बॅडमिंटनच्या पुरुष दुहेरीत प्रथमच दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.

कोरियन ओपन स्पर्धेत गेल्या आठवड्यात उपांत्य फेरीत चीनच्या ज्या लियांग वेई केंग आणि वँह चँग यांचा पराभव केला होता. त्याच या जोडीला खाली खेचून सात्विक आणि चिराग यांनी हा दुसरा क्रमांक मिळवला आहे.

विद्यमान आशियाई विजेते असलेल्या सात्विक-चिराग यांनी कोरियन ओपन (सुपर ५००), स्विस ओपन (सुपर ३००) आणि इंडोनेशिया ओपन (सुपर १०००) अशी तीन विजेतेपदे यंदाच्या मोसमात मिळवलेली आहेत, त्यामुळे त्यांच्या खात्यात ८७,२११ गुण जमा झाले आहेत.

गेल्या आठवड्यापर्यंत दुसऱ्या स्थानावर असलेल्या चीनच्या जोडीलाच नव्हे, तर याच स्पर्धेत अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीतल अव्वल स्थानावर असलेल्या फजर अलफियन आणि मुहम्मद रियान अद्रिनातो यांचीही शिकार करून सात्विक-चिराग यांनी विजेतेपद मिळवले होते. जागतिक बॅडमिंटनच्या वर्ल्ड टूर स्पर्धांत भारताच्या या जोडीने सलग १० सामने विजयाची मालिका गुंफलेली आहे.

सिंधू १७ व्या स्थानावर कायम

कोरियन ओपन स्पर्धेत पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागलेल्या पी. व्ही. सिंधूने महिला एकेरीतील गतवेळचे १७ वे स्थान कसेबसे कायम राखले. वास्तविक हे तिचे कारकिर्दीतील सर्वांत कमी मानांकन आहे. तसेच लंडन ऑलिंपिकमधील ब्राँझपदक विजेती साईना नेहवालची तर ३७ व्या स्थानापर्यंत घसरण झाली आहे.

पुरुष एकेरीत एचएस प्रणोय हा भारताचा सर्वांत चांगले मानांकन असलेला खेळाडू ठरला आहे. नव्या क्रमवारीनुसार तो १० व्या स्थानावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT