Cricket sakal
क्रीडा

Cricket News : सौराष्ट्राचा पहिल्या डावाच्या आधिक्यावर विजय

सौराष्ट्र, राजकोट येथे सुरू असलेल्या पश्चिम विभागीय चौदा वर्षांखालील गटाच्या साखळी क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राविरूद्धच्या अनिर्णित सामन्यात सौराष्ट्र संघाने पहिल्या डावातील आधिक्याच्या जोरावर विजय मिळविला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सौराष्ट्र, राजकोट येथे सुरू असलेल्या पश्चिम विभागीय चौदा वर्षांखालील गटाच्या साखळी क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राविरूद्धच्या अनिर्णित सामन्यात सौराष्ट्र संघाने पहिल्या डावातील आधिक्याच्या जोरावर विजय मिळविला. सानोसारा येथे झालेल्या या तीन दिवसीय सामन्यात महाराष्ट्राच्या पहिल्या डावातील १५४ धावांस उत्तर देताना सौराष्ट्राने पहिल्या डावात १७५ धावा करून २१ धावांची मिळविलेली आघाडी महत्त्वपूर्ण ठरली.

त्यानंतर महाराष्ट्राने दुसऱ्या दिवसअखेर चार बाद ९६ धावा केल्या आजच्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राचा दुसरा डाव २१७ धावांत आटोपला. काल नाबाद असलेल्या एकनाथ देवाडेने शानदार शतकी शतकी खेळी केली त्याने अठरा चौकारांसह १२६ धावांची खेळी केली. सौराष्ट्र संघाला विजयासाठी १९६ धावांची गरज होती त्यांनी पाच बाद १५० धावा केल्या. या लढतीतून सौराष्ट्र संघाने पहिल्या डावाच्या आधिक्यावर तीन गुण मिळविले. तर महाराष्ट्राला एका गुणावर समाधान मानावे लागले.

धावफलक :

महाराष्ट्र - पहिला डाव १५४ आणि दुसरा डाव २१७ (एकनाथ देवाडे १२६, अर्जुन सोनार २६, प्रज्वल मोरे २१, महर्षी वाघेला ४-७९, नेव्हिल डांगर २-३५, हर्षवर्धन तन्ना २-३७) अनिर्णित विरुद्ध सौराष्ट्र पहिला डाव १७५ व दुसरा डाव - (५८ षटकांत) ५ बाद १५० (पूर्वा साखिया नाबाद ५२, मंथन रावळ ३३, अर्जुन साळुंके २-२८, अर्जुन सोनार २-३७, प्रसाद आंबले १-४४)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs SRH: वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल अन्... विदर्भच्या पोरांनं मैदान गाजवलं; जे भल्याभल्यानां जमलं नाही ते सामन्यात करून दाखवलं

Baramati Bypoll News: बारामती पोटनिवडणूक : सुनेत्रा पवारांच्या विजयासाठी भाजपचा बूथस्तरावर निर्धार, विकासकामांवर भर

Nashik Dharmantar Case: नाशिकमधील धर्मांतर प्रकरणाची ‘एसआयटी’मार्फत चौकशी करा; डॉ. नीलम गोऱ्हे यांचे पोलिसांना निर्देश!

Pune Drunk and Drive News : पुण्यात ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’वर कडक कारवाई; २२९ मद्यपी चालकांचे समुपदेशन, वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

SCROLL FOR NEXT