Scary scenes at PSL 2023 match as floodlight tower catches fire due to opening-ceremony mishap Video Viral cricket news  
क्रीडा

PSL Opening: बिचारे पाकिस्तान! फटाके पण उडवता येत नाही, लागली स्टेडियममध्ये आग Video Viral

सकाळ ऑनलाईन टीम

PSL Opening Video Viral : पाकिस्तान सुपर लीग सीझन 8ला कालपासुन सुरूवात झाला. हंगामाची नेहमीप्रमाणेच मोठ्या धूमधडाक्यात सुरु झाला. लाहोर कलंदर आणि मुलतान सुलतान यांच्यातील सामन्यापूर्वी मैदानावर संगीत आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. फटाके हा या उत्सवाचा केंद्रबिंदू होता.

यादरम्यान अशी एक घटना घडली ज्याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रकाश आणि धूर कमी झाल्यावर फटाक्यांच्या प्रदर्शनामुळे मैदानात काहीतरी गडबड झाल्याचे दिसून आले. खरं तर जास्त फटाक्यांमुळे, फ्लडलाइट टॉवरपैकी एक खराब झाला आणि आग लागली.

पाकिस्तानमधील मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तान सुपर लीग (PSL) च्या 2023 सीझनचा पहिला सामना उशीर झाला कारण उद्घाटन समारंभात फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मुलतान क्रिकेट स्टेडियममधील फ्लडलाइट्सच्या काही भागाला आग लागली.

सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये फ्लडलाइट्सला आग लागल्याने सामना पाहण्यासाठी जमलेल्या चाहत्यांमध्ये घबराट झाली. अग्निशमन दल आल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. या घटनेमुळे लाहोर कलंदर आणि मुलतान सुलतान यांच्यातील सामना लांबला.

मुलतान सुलतान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फखर जमानच्या 66 धावांच्या खेळीमुळे लाहोर कलंदर संघाने निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 175 धावा केल्या होत्या. मुलतान सुलतान संघ केवळ 174 धावाच करू शकला आणि सामना 1 धावाने गमावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket in Trouble: पाकिस्तानला 'नाटक' महागात पडणार, ICC ने पाठवला ई मेल! PCB ने स्पर्धेचे अनेक नियम मोडले, आता...

Asia Cup 2025 Super 4 Schedule: भारतीय संघ कोणत्या तारखांना कोणाला भिडणार? जाणून घ्या सुपर ४ चं संपूर्ण वेळापत्रक

AFG vs SL Live: लक्ष्य १७० धावांचे, पण १०१ धावा करताच श्रीलंका पोहोचली Super 4 मध्ये; अफगाणिस्तानला लटकवले, कसे ते घ्या जाणून...

Adani Group News : अदानी समूहाला मोठा दिलासा; 'SEBI'ने 'हिंडेनबर्ग'चे आरोप फेटाळले!

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून ३१ तासांनी १२६३ क्युसेक विसर्ग सुरू

SCROLL FOR NEXT