Senegal Fans Showers Laser Beams on Mohamed Salah esakal
क्रीडा

Video: सेनेगलचा रडीचा डाव; सालहच्या डोळ्यावर लेझरचा मारा

सकाळ डिजिटल टीम

इजिप्त आणि सेनेगल यांच्यात झालेल्या फिफा वर्ल्डकप क्वालिफायर सामन्यात सेनेगलने (Senegal) इजिप्तवर (Egypt) पेनाल्टी शूटआऊटमध्ये 3-1 असा पराभव केला. याचबरोबर सेनेगल 2022 फिफा वर्ल्डकप क्वालिफायर प्ले ऑफ जिंकली. मात्र या फुटबॉल सामन्यादरम्यान सेनेगलच्या फॅन्सकडून खिलाडूवृत्तीला काळिमा फासणारी घटना घडली. पेनाल्टी शूटआऊटवेळी मोहम्मद सालाह (Mohamed Salah) आणि इजिप्तचा गोलकिपर मोहम्मद अल्शेनावेसह इतर खेळाडूंच्या डोळ्यावर असंख्य लेझर्सचा (Laser Beams) मारा करण्यात आला.

इजिप्त सेनेगलच्या सामन्यादरम्यान दुसऱ्या हाफमध्ये 1 गोलने आघाडीवर होती. मात्र सामना संपण्यासाठी फक्त 4 मिनिट राहिले असताना हामदी फाथीने स्वयंम गोल केला आणि सामना बरोबरीत आला. ही बरोबरी सामना एक्स्ट्रा टाईममध्येही कायम राहिली. त्यामुळे सामना पेनाल्टी शूटआऊटवर गेला.

दरम्यान, सेनेगलच्या फॅन्सनी रडीचा डाव खेळण्यास सुरुवात केली. त्यांनी इजिप्तच्या गोलकिपरसह अनेक खेळाडूंवर असंख्य लेझर बीमचा मारा केला. इजिप्तचा स्टार फुटबॉलर मोहम्मद सालाहच्या चेहऱ्यावर देखील लेझर बीम्सचा मारा करण्यात आला. मोहम्मद सालाह याही परिस्थितीत आपले मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्याची पेनाल्टी हुकली.

स्टू होल्डन या समालोचकाने केलेल्या ट्विटनुसार सालाहच्या चेहऱ्यावर पेनाल्टी मारताना जवळपास 3000 लेझर बीमचा मारा करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ए. आर. रहमान यांच्या मुलाचा अपघात; पहाटे 3 वाजता Porsche ची धडक

Marathi News Live Updates : झारखंडमध्ये JPSC-JSSC विद्यार्थ्यांच्या 'विधानसभा घेराव' मोर्चात पोलिसांचा लाठीचार्ज, आंदोलक विद्यार्थी आक्रमक

Blocked Nose: सर्दी नाही तरी रात्रीच्या वेळी नाक का बंद होते? जाणून घ्या कारण आणि सोपे उपाय!

Mumbai Train Disturb: मुलुंड स्टेशनमध्ये ट्रेनवर काहीतरी पडले; आग लागली.. धुरांचे लोट अन् मध्य रेल्वेची वाहतुक विस्कळीत Video

Bhudargad Fort Wall Collapse : अवघ्या 2 वर्षांत ऐतिहासिक भुदरगड किल्ल्याची 50 फूट लांबीची तटबंदी कोसळली; कोट्यवधींचा निधी पाण्यात, गडप्रेमींचा तीव्र संताप

SCROLL FOR NEXT