Shadab Khan crying in the pavilion sakal
क्रीडा

VIDEO : झिम्बाब्वे विरुद्धच्या धक्कादायक पराभवानंतर शादाब खान ढसाढसा रडला

Kiran Mahanavar

Shadab Khan crying VIDEO : झिम्बाब्वेने टी-20 विश्वचषकाच्या सामन्यात पाकिस्तानचा एका धावाने पराभव केला. ज्यामुळे संपूर्ण पाकिस्तानी संघ मानसिकदृष्ट्या खचला आहे आणि पराभवानंतर संपूर्ण संघ रडत आहे. यात संघाचा उपकर्णधार शादाब खानचाही सहभाग होता. तो रडताना कॅमेऱ्यात कैद झाला. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

झिम्बाब्वेविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 सामन्यात 131 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाने 36 धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. यानंतर शादाब खान (17) आणि शान मसूद (44) यांनी 52 धावांची भागीदारी केली. मात्र येथे शादाब बाद झाल्यानंतर पाकिस्तान संघात विकेट पडण्याची प्रक्रिया सुरू झाली. शेवटच्या षटकात पाकिस्तान संघाला 4 चेंडूत 4 धावांची गरज होती. त्यानंतर मोहम्मद वसीम आणि मोहम्मद नवाज क्रीजवर होते, पण त्यांना सामना जिंकता आला नाही.

प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने 20 षटकांत 8 गडी गमावून 130 धावा केल्या. झिम्बाब्वेच्या 130 धावांना प्रत्युत्तर देताना पाकिस्तानचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून 129 धावाच करू शकला. वास्तविक पाकिस्तानला सामना जिंकण्यासाठी शेवटच्या चेंडूवर 3 धावा करायच्या होत्या, पण फलंदाज शाहीन आफ्रिदीला केवळ 1 धाव करता आली. अशा प्रकारे झिम्बाब्वेने हा सामना 1 धावांनी जिंकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT