PAK vs NED Shadab Khan Video  esakal
क्रीडा

PAK vs NED | VIDEO : ...अन् शादाब खाननं कपाळावर हात मारून घेतला

अनिरुद्ध संकपाळ

PAK vs NED Shadab Khan Video : टी 20 वर्ल्डकप 2022 मध्ये आज 29 व्या सामन्यात पाकिस्तानने नेदरलँडचा सहा विकेट्स राखून पराभव केला. पाकिस्तानने दमदार गोलंदाजी करत नेदरलँडला 20 षटकात 9 बाद 91 धावांवर रोखले. गोलंदाजीत पाकिस्तानचा लेग स्पिनर शादाब खानने 22 धावात 3 तर मोहम्मद वसिमने 3 षटकात 15 धावा देत 2 बळी टिपले. शादाब खानने आजच्या सामन्यात पाकिस्तानकडून सर्वाधिक विकेट्स घेतल्या. मात्र सोशल मीडियावर शादाब खानच्या कामगिरीचा नाही तर एक दुसराच व्हिडिओ व्हायरल होत आहे.

लेग स्पिनर शादाब खानने सामन्याचे नववे षटक टाकत असताना षटकाच्या पहिल्याच चेंडूवर नेदरलँडचा अव्वल फलंदाज मॅक्स ओडोव्हला 8 धावांवर पायचित पकडले. त्यानंतर नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्स क्रीजवर आला. त्याने पहिला चेंडू तटवून काढला. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर पुन्हा शादाब खानने पायचितची जोरदार अपिल केली. शादाब खान आपल्या गुगलीवर इतका विश्वास होता की त्याने DRS घेतला. इम्पॅक्ट ऑफ स्टम्पच्या खूपच बाहेर होता. त्यामुळे पाकिस्तानचा DRS वाया गेला. दरम्यान, रिव्ह्यू वाया गेल्याने शादाब खानने कपाळावर हात मारून घेतला. सध्या हाच व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पाकिस्तानने नेदरलँडचे 92 धावांचे माफक आव्हान पार करताना देखील आपले चार फलंदाज गमावले. बाबर आझम 4 तर फखर झमान 20 धावा करून बाद झाले. दरम्यान, सलामीवीर मोहम्मद रिझवानने 39 चेंडूत 49 धावा करत पाकिस्तानला विजयाच्या जवळ आणून ठेवले. मात्र तो 13 व्या षटकात बाद झाला. दरम्यान, 16 चेंडूत 12 धावा करणारा शान मसूद विजयासाठी 1 धावेची गरज असताना झेलबाद झाला. अखेर शादाब खानने चौकार मारत सामना 14 व्या षटकात संपवला. नेदरलँडकडून ब्रँडन ग्लोव्हेरने 22 धावा देत दोन बळी टिपले. तर पॉल मीकेरेनने 1 विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates: पुढच्या वर्षी लवकर या! पुणे, मुंबईसह आज राज्यात गणेश विसर्जन मिरवणुकीची धूम

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : ६ सप्टेंबर २०२५ ते १२ सप्टेंबर २०२५ - मराठी राशी भविष्य

अग्रलेख : तंत्रज्ञानाचे ‘विक्रम’ संवत!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 6 सप्टेंबर 2025

हौस ऑफ बांबू : पुस्तकं, गप्पा आणि मॅजेस्टिक अशोकराव...!

SCROLL FOR NEXT